(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या मालिकेच्या निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे शिल्पा शिंदेने २०१६ मध्ये ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका सोडली होती.. त्यानंतर शुभांगी अत्रे अंगूरी भाभीच्या भूमिकेत मालिकेत दाखल झाली आणि तिनेही प्रेक्षकांची मन जिंकली.
शिल्पाच्या एक्झिटनंतर तिने अनेक रियलिटी शो आणि प्रोजेक्ट्समध्ये काम केले, तरीही ‘अंगूरी भाभी’ची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मालिकेच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा शिल्पाला अंगूरी भाभीच्या भूमिकेसाठी संपर्क साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार “शिल्पा अंगूरी भाभीच्या रूपात परत येण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि सर्वांना अपेक्षा आहे की ही डील लवकरच फाइनल होईल. हा निर्णय घेण्यात आला कारण सर्वांना वाटते की शो पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे. एक दशक यशस्वीपणे चालल्यानंतर आता चॅनेल शोला नवीन रूप देण्यासाठी पात्रे आणू इच्छित आहे.”
सध्या अभिनेत्री आणि मेकर्सनी या विषयावर काहीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. पण जर शिल्पा शिंदे शोमध्ये परत आली तर हे चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे.






