(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेला SIIMA अवॉर्ड्स २०२५ पूर्णपणे ‘पुष्पा २: द रुल’ या नावाने साजरा झाला होता. दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांच्या टीमने एकाच वेळी पाच प्रमुख श्रेणींमध्ये विजय मिळवला आहे. या विजयानंतर, सुकुमार यांनी स्टेजवरूनच घोषणा केली ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दिग्दर्शकाने ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’च्या निर्मितीला मान्यता दिली आहे. ही बातमी ऐकताच चाहते खूप आनंदी झाले आहेत.
‘पुष्पा २’ च्या नावावर ५ पुरस्कार
या कार्यक्रमादरम्यान, अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, रश्मिका मंदानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, देवी श्री प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शंकर बाबू कंदुकुरी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. या मोठ्या विजयानंतर, अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर लिहिले की, सलग तिसऱ्यांदा SIIMA पुरस्कार जिंकणे हा त्याच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्याने याचे श्रेय त्याच्या दिग्दर्शकाला, संपूर्ण टीमला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या चाहत्यांना दिले आहे.
Bigg Boss 19: मुनावर फारुकीने सलमान समोर अभिषेक बजाजला केले रोस्ट, म्हणाला ‘आवाज खूप करतो, पण काम…’
‘पुष्पा ३’ ची केली घोषणा
खरं तर पुरस्कार सोहळ्यादरम्यान, होस्टने गमतीने विचारले- ‘पार्टी नाहीये पुष्पा?’ यानंतर, प्रश्न आला की तिसरा भाग बनवला जाईल की नाही. सुकुमारने प्रथम अर्जुन आणि निर्मात्याकडे पाहिले आणि त्यांच्या हावभावावर हसत म्हणाला- ‘नक्कीच, पुष्पा ३ येत आहे.’ आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या बातमीने चाहते खूप आनंदी झाले आहे.
‘पुष्पा’ फ्रँचायझीचा आतापर्यंतचा प्रवास
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राईज’ने महामारीच्या काळात सुमारे ३५० कोटी रुपये कमाई करून वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनण्याचा विक्रम केला. त्यानंतर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २: द रूल’ने जगभरात १८७१ कोटी रुपये कमाई करून भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला. हा चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आणि अखिल भारतीय स्तरावर ‘दंगल’च्या मागे होता. चित्रपटातील अल्लू अर्जुनची पुष्पा राजची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली.
गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमारने केले असे काही की, युजर्सने केले कौतुक; म्हणाले ‘खिलाडी एक नंबर’
कथेचा पुढचा भाग काय असेल?
‘पुष्पा २’ एका मोठ्या अडचणीत संपला, ज्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला की कथा पुढे कुठे जाईल. दिग्दर्शक सुकुमार यांच्याकडे इतर चित्रपटांची रांग असल्याने आणि अल्लू अर्जुन सध्या दीपिका पदुकोणसोबत अॅटली यांच्या साय-फाय चित्रपटात काम करत असल्याने तिसरा भाग कदाचित येणार नाही अशी शंका अनेकांना होती. पण आता ‘पुष्पा ३’ च्या पुष्टीमुळे सर्व शंका दूर झाल्या आहेत. आणि या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.