(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी चित्रपट फ्रँचायझी ‘हेरा फेरी’ सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की अभिनेता परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ पासून स्वतःला दूर केले आहे, त्यांनी हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला आहे. त्यानंतर ही बातमी ऐकून चाहते खूप निराश झाले आहेत. जेव्हा ‘श्याम’ म्हणजेच सुनील शेट्टीला ‘बाबू भैया’ चित्रपट सोडण्याच्या बातमीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी काय म्हटले हे आपण जाणून घेणार आहोत.
सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली
‘बॉलिवूड बबल’ यांना दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी परेश रावल यांच्या चित्रपट सोडण्याच्या बातमीबद्दल बोलताना म्हटले की, ‘बाबू भैया आणि अक्षय कुमारच्या राजू या पत्राशिवाय ‘हेरा फेरी’ हा चित्रपट कसा काय बनू शकतो,’ सुनीलने स्पष्ट शब्दात सांगितले की जर परेश रावल चित्रपटात नसतील तर श्यामसारखे पात्र अस्तित्वातच राहणार नाही. ते पुढे म्हणाले की ‘हेरा फेरी’ हा फक्त एक चित्रपट नाही तर एक अनुभव आहे, जो तिन्ही कलाकार एकत्र असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे.
सुनील शेट्टी ‘केसरी वीर’ मध्ये दिसणार
अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या आगामी ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, जो २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. मुलाखतीत सुनीलशेट्टी यांनी सांगितले की, चित्रपटातील त्यांचे पात्र एका प्रामाणिक आणि खऱ्या नेत्याला पाठिंबा देताना दिसणार आहे, जो समाजात बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहतो.’ हा चित्रपट येत्या २३ मे ला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
सुनील शेट्टीचे आगामी प्रोजेक्ट्स
जर आपण सुनील शेट्टीच्या आगामी चित्रपटांची यादी पाहिली तर तो लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. याशिवाय, ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपटही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये समाविष्ट आहे, जो प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहे.ज्याच्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.