(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनीता आहूजा, म्हणजेच अभिनेता गोविंदाची पत्नी, सध्या चर्चेत आहेत त्यांच्या नव्या YouTube चॅनलमुळे. त्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन, मंदिरांची माहिती आणि स्थानिक खाण्याच्या ठिकाणांचा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत.
पण नुकत्याच त्यांच्या व्ह्लॉगमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे.सुनीता यांनी सांगितले की, ”आज मी खूप तणावात आहे, माझा साखरपुड्याचा सॉलिटेअर मला कुठे ठेवला हे माहीत नाहीये. मी तीच शोधत आहे पण मला ती सापडत नाहीये. सगळ्यांची नजर तिच्यावरच होती, ती खूप महाग होती.” त्यानंतर ती मुंबा देवीच्या मंदिरात गेली आणि तिने आशीर्वाद घेतला, तसेच आपली अंगठी परत मिळण्यासाठी प्रार्थना केली. नंतर, तिने सांगितले की अंगठी बॅगमध्येच होती आणि ती बाहेर काढायला विसरली होती.
या दरम्यान त्या मंदिराच्या आत दिसल्या, जिथे त्यांनी आशीर्वाद मागितला आणि म्हणाल्या, ”खूप वर्षांपूर्वी मी गोविंदासोबत येथे दर्शनासाठी आले होते. आज खूप छान दर्शन झाले. चीची माझ्यावर खूप प्रेम करतो आणि जगात कोणीही येवो किंवा जावो पण आम्ही कधीच एकमेकांना सोडणार नाही.”
ऐन दिवाळीत नोरा फतेहीचा हळदीसोहळा? कोरियन अभिनेत्यासोबतचे फोटो पाहून चाहते थक्क, Photo व्हायरल
दरम्यान, काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नात दुरावा आणि घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमात दोघंही एकत्र दिसल्यामुळे या अफवांना पूर्णविराम मिळाला.
गोविंदा आणि सुनीताचे लग्न १९८७ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहेत टीना आहूजा आणि यशवर्धन आहूजा. गेल्या वर्षी गोविंदाला त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून चुकून पायात गोळी लागली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांनंतर, गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.