(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेला “शोले” हा चित्रपट जय आणि वीरू यांच्यातील खऱ्या मैत्रीचे दर्शन घडवतो. हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरला आणि १२ डिसेंबर रोजी तो पुन्हा प्रदर्शित होत आहे.या चित्रपटातील सगळी पात्र अगदी गब्बरपासून सुरमा भुपालीपर्यंत आणि ठाकूरपासून जय- विरू पर्यंत प्रत्येकाच्या स्मरणात आहे. शोले चित्रपटाला या 15 ऑगस्टला 50 वर्षे पूर्ण झाली आहे. चित्रपटांचा सुवर्णकाळ ज्या चित्रपटापासून सुरू झाला तो शोले चित्रपट आता सुवर्ण महोत्सवी वर्षात आहे. या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सलीम-जावेद यांनी लिहिलेली सुपरहिट स्क्रिप्ट आणि अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया भादुरी, अमजद खान, असरानी यांसारख्या दिग्गज कलाकारांची जबरदस्त फौज असलेला हा चित्रपट आहे. गब्बर, ठाकूर, जय, विरू, बसंती आणि राधा या प्रमुख पात्रांच्या भोवती कथा फिरते. १२ डिसेंबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असून त्याचा नवा ट्रेलर सध्या खूप चर्चेत आहे.
शोले’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. या चित्रपटातील संवाद आणि पात्र पिढ्यान्पिढ्या लक्षात ठेवले गेले आहेत. चित्रपटात हिंसा असून सुरुवातीला समीक्षकांनी त्याचा शेवट नापसंतीने पाहिला, पण सलीम-जावेद आणि जी.पी. सिप्पी यांनी शेवट बदलला आणि चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. १५ ऑगस्ट १९७५ रोजी रिलिज झालेला ‘शोले’ आजही भारतीय प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हा चित्रपट पाच दशकांपासून मनोरंजन देत आहे आणि यात ड्रामा, कॉमेडी आणि अॅक्शन या सगळ्या गोष्टी आहेत.
जी.पी. सिप्पींच्या दिग्दर्शनाखाली, आर. डी. बर्मन यांच्या संगीतासह अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान आणि इतर दिग्गज कलाकारांच्या दमदार कामामुळे ‘शोले’ हा चित्रपट एक महान क्लासिक बनला. प्रत्येक पात्रावर विशेष लक्ष देऊन तयार केले असल्यामुळे ठाकूर, जय, विरू, बसंती, राधा यांसारखेच जेलर, हरिराम नाई, कालिया, सांबा असे सर्व पात्रही प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. ‘शोले’ आता अॅमेझॉनवरही पाहता येतो. पूर्वी मल्टिप्लेक्स नसताना हा चित्रपट सिंगल स्क्रीनवरही पुन्हा-पुन्हा चालवला जात असे आणि त्याची कमाई जोरदार होत असे. ९०च्या दशकापर्यंत हेच होतं. आता प्रेक्षकांसाठी शोले पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि या चित्रपटाच्या कथा सर्वांनाच आठवतात
वयाच्या साठीत आमिर खानला झाले पुन्हा प्रेम; रीना, किरणसोबतच्या नात्यांवर म्हणाला, ‘माझे लग्न टिकले नसते तरी…’
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन प्रेमकहाणी या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. धर्मेंद्रने हेमा मालिनीसाठी वीरूची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की शूटिंग दरम्यानही धर्मेंद्रने हेमा मालिनींना प्रभावित करण्यात कोणतीही कसर सोडली नाही?






