(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटी १९ मार्च २०२५ रोजी आणखी एक बहुप्रतिक्षित वेबसिरीज घेऊन आली आहे. “खदान” हंगामा ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. यात अली गोनीसह करणवीर बोहरा आणि रेबेका आनंद मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हंगामा ओटीटीवर प्रसारित झालेली ही मालिका एक रोमांचक थ्रिलर दिसते जी सस्पेन्स आणि अॅक्शन यांचं मिश्रण आहे.
Housefull 5: जॉन अब्राहमने का नाकारला ‘हाऊसफुल ५’? अभिनेत्याने कारण केले उघड!
भयानक भूतकाळाने पछाडलेल्या खाण गावात इन्स्पेक्टर वीर प्रताप सिंग (अली गोनी) शांततेच्या शोधात असतो, पण इथे येऊन तो एका वेगळ्याच पेचात फसला जातो. गावात एका संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या झाल्याचे आढळून येते, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. या हत्येचा सूड घेण्यासाठी आत्मा परत आली आहे का? गावाला दीर्घकाळापासून असलेला शाप पुन्हा लागला आहे का? तपासादरम्यान सापडलेल्या शेकडो मृतदेहांमागे कोण आहे? वीर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोध असतो. याचदरम्यान तो रहस्य आणि फसवणुकीच्या जाळ्यात खोलवर ओढला जातो. प्रत्येक रहस्य उलगडताना दंतकथा आणि वास्तव यांच्यातील रेषा पुसट होत जातात, ज्यामुळे एक सत्य समोर येते जे त्याच्या दृढनिश्चयाची परीक्षा घेते आणि ज्यामुळे त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलतो.
हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ सिद्धार्थ रॉय म्हणाले ,“’खदान’ लाँच करून, आम्ही हंगामा ओटीटीवर मूळ कंटेंटसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित करत आहोत. ही आकर्षक थ्रिलर आमच्या प्रेक्षकांना रोमांचित करणारी, गुंतवून ठेवणारी आणि मोहित करणारी आहे. हंगामावर, आम्ही नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय मनोरंजनाचा अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
अली गोनी त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना मूळ मालिकेत काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “खदानमध्ये वीर प्रताप सिंगची भूमिका साकारणे खरोखरच खास आणि माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या भूमिकेमुळे मी मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून हॉरर-थ्रिलर शैलीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे, अशा पद्धतीची भूमिका मी याआधी कधीही साकारली नव्हती. हा सिरीज खरोखरच आकर्षक आहे. मला पटकथा वाचण्यापासून ते शूटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया खूप आवडली. ही, कथा नक्कीच गुंतवून ठेवणारी असून मला आशा आहे की प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल”.
तसेच, खदानमधील भूमिकेबद्दल बोलताना करणवीर बोहरा म्हणाले, अशा प्रकारची भूमिका पडद्यावर साकारणे खरंच आव्हानात्मक असते, आणि मला ते आवडते. खदानमध्ये एका कथेत अनेक परस्पर कथा विणलेल्या आहेत. प्रत्येकाचा स्वत:चा संघर्ष आणि भूतकाळातील नकारात्मक अनुभव आहेत. प्रत्येक पात्र या प्रवासात स्वतःचे सत्य शोधण्यासाठी त्यांच्या समोर येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करतात हे पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता आणि मला आशा आहे की प्रेक्षक आम्ही केलेल्या मेहनतीचे कौतुक करतील,” असे ही अभिनेता पुढे म्हणाला.
प्रज्ञाची भूमिका साकारणारी रेबेका आनंद म्हणाल्या, “खदान कपट याने भरलेला एक चक्रव्यूह आहे, यात भूतकाळातील न सुटलेले संघर्ष आहेत. वीर आणि प्रज्ञा हे रहस्यमय गाव उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. वेबसिरीज जस जशी पुढे जाईल तशी प्रेक्षकांना एका रंजक वळणावर प्रज्ञाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांना ते नक्कीच खिळवून ठेवतील.” १९ मार्च २०२५ रोजी हंगामा ओटीटी वर प्रदर्शित होणारा ‘खादान’ हा शो प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ही मालिका आता हंगामा आणि टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्ही यासारख्या भागीदार प्लॅटफॉर्मवर केवळ स्ट्रीम होत आहे.