(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
क्रिकेटर स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. या दोघांचेही येत्या 23 नोव्हेंबर 2025 ला होणारी ग्रँड वेडिंग होणार होते जे आता अचानक पुढे ढकलण्यात आले आहे. दोघांच्या नात्याबद्दल आता धक्कादायक खुलासे करण्यात आले. या प्रकरणात आता एका व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. जिचे नाव मेरी डि’कोस्टा आहे जी एक कोरिओग्राफर आहे. असं सांगितलं जात आहे की, पलाश मु्च्छलच्या चॅट्सचे जे स्क्रिन शॉर्ट्स व्हायरल होत आहेत, त्यामधील मुलगी म्हणजे, कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टा ही आहे. ही नक्की कोण आहे? आणि हिने पलाश मुच्छलसोबतचे चॅट का शेअर केले असे अनेक प्रश्न चाहत्याना पडले आहेत.
पलाश आणि स्मृती मानधनाचं लग्न झालं रद्द?
पलाश आणि स्मृतीच्या संगीत समारंभातील कार्यक्रम सुरु असताना स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे समोर आले ज्यामुळे या दोघांचे लग्न रद्द झाल्याचं सांगितलं जात होतं. पण, त्यानंतर जे कारण समोर आले ते खरोखरच धक्कादायक होते. पलाश मुच्छलची तब्येत बिघडल्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे यानंतर समोर आले. पलाशची बहिण आणि सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनंही स्मृतीचे वडील आजारी असल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलेलं. पण, आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्यामुळे लग्न रद्द होण्याचं कारण स्मृतीच्या वडिलांची तब्येत नसून पलाशचे इंटरनेटवर व्हायरल झालेले चॅट्स असल्याचे सांगितले जात आहे.
पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित
पलाशवर स्मृतीला धोका दिल्याचा आरोप
पलाश मुच्छलवर फसवणूकीचे गंभीर आरोप लावण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण वादग्रस्त बनत चालले आहे आणि मेरी डि’कोस्टा नावाच्या महिलेने त्याच्यासोबतच्या तिच्या कथित फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. व्हायरल झालेल्या चॅट्सनुसार, पलाश मेरीला भेटण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसून आले आहे. मेरीनं त्याला स्मृतीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल विचारलं असता, पलाश त्यांना ‘मृत’ आणि ‘लाँग डिस्टन्स’ रिलेशनशिप म्हणून वर्णन करतो.
पलाशचे फ्लर्टी चॅट्स लीक करणारी मेरी डि’कोस्टा कोण?
आता, फ्लर्टी चॅट्स लीक करणारी व्यक्ती मेरी डि’कोस्टाबद्दल सांगायचे झाले तर, मीडिया रिपोर्टनुसार, स्क्रीनशॉट व्हायरल करणारी महिला ही एक कोरिओग्राफर असल्याचे समोर आले आहे. जी पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या लग्नाच्या तयारीत सहभागी होती. दोघांच्या संगीतच्या डान्सची कोरिओग्राफी मेरी डि’कोस्टा हिनंच केली आहे.
Bigg Boss 19 : अखेर ‘या’ स्पर्धकाने जिंकला Ticket To Finale, ‘बिग बॉस’ला मिळाला शोचा पहिला फायनलिस्ट
रेडिटवर लावले जातायत गंभीर आरोप
रेडिटवरील काही युजर्सनी आरोप केलाय की, स्मृतीच्या वडिलांनी लग्नापूर्वीच्या सोहळ्यांमध्ये मेरी डि’कोस्टासोबत पलाशला पाहिलेलं. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. यामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं ते अंदाज लावत आहे. दरम्यान, असं दावे नंतर रेटिड पोस्टमधून काढण्यात आले. अद्याप या दाव्यांवर कुटुंबातील कुणीच अधिकृत वक्तव्य केलेले नाही.






