(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गायक पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना २३ नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार होते. मात्र, स्मृतीच्या वडिलांच्या अचानक आजारामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. स्मृती आणि पलाशचे लग्न अचानक पुढे ढकलण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क समोर येत आहेत. काही धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. दरम्यान, पलाशचे एका महिलेसोबतचे चॅट्स व्हायरल झाल्यानंतर आता त्याचा एक्स गर्लफ्रेंड सोबतच फोटो देखील व्हायरल होत आहेत, ज्याबद्दल चाहते चर्चा करताना दिसले आहेत. पलाशने त्याच्या प्रेयसीला एका गुडघ्यावर प्रपोज केले होते.
Bigg Boss 19 : अखेर ‘या’ स्पर्धकाने जिंकला Ticket To Finale, ‘बिग बॉस’ला मिळाला शोचा पहिला फायनलिस्ट
लग्न पुढे ढकलल्यापासून, सोशल मीडियावर पलाशवर विविध आरोप लावले जात आहेत. आता, त्याच्या एक्स प्रेयसीसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये संपूर्ण प्रपोजल सेटअप दिसत आहे, ज्यामध्ये पलाश त्याच्या जोडीदाराला एका गुडघ्यावर प्रपोज करताना दिसला आहे. जसे त्याने स्मृती मानधनाला प्रपोज केले होते. हे फोटो आता चर्चेत आले आहेत.
Btw She is Palash Muchhal’s ex.👀 https://t.co/bkjHpqz07I pic.twitter.com/DnFusW59qY — Mention Cricket (@MentionCricket) November 25, 2025
ही एक्स गर्लफ्रेंड कोण आहे?
ऑनलाइन वापरकर्त्यांनी एक्स प्रेयसीला प्लास्टिक सर्जन असल्याचे म्हटले आहे. बिरवा शाह असे तिचे नाव असून, दावा केला आहे की प्रपोजल फोटो २०१७ चे आहेत. वृत्तानुसार, परस्पर मित्रांद्वारे भेटल्यानंतर पलाशने २०१९ मध्ये स्मृतीला डेट करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षीच या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिकरित्या माहिती दिली.
स्मृतीने सर्व पोस्ट केल्या डिलीट
लग्न पुढे ढकलल्यानंतर, स्मृती मानधनाने तिच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. लग्न समारंभापासून ते प्रपोजल व्हिडिओपर्यंत, स्मृतीने तिच्या अकाउंटवरून प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो काढून टाकला आहे. हळदी समारंभात स्मृती तिच्या टीमसोबत नाचत असल्याचा व्हिडिओ देखील डिलीट करण्यात आला आहे. यामुळे चाहते अस्वस्थ झाले आहेत. स्मृती आणि पलाश सर्व वृत्तांवर मौन बाळगून आहेत. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.






