Cryptocurrency Fraud Case Tamannaah Bhatia And Kajal Aggarwal To Be Questioned By Puducherry Police
पॉंडेचेरी सायबर क्राईम पोलिसांनी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगच्या नावाखाली देशभरात ५० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना कोईम्बतूर अटक केली आहे. क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि काजल अग्रवाल यांचीही आता चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. पॉंडेचेरी सायबर क्राईम पोलिसांनी क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात तमन्ना आणि काजल अग्रवाल यांना बोलावून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीही अभिनेत्रींच्या टीमचे म्हणणे आहे की, तमन्ना आणि काजल यांना कोणत्याही चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.
आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लगीनघाई, मोठा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात
पॉंडेचेरीतील मूलक्कुलम येथील रहिवासी निवृत्त सैनिक अशोकन यांच्यासह १० जणांची ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आधारावर पॉंडेचेरी सायबर क्राईम पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. चौकशीदरम्यान, कोईम्बतूर येथील एका फसवणूक करणाऱ्या टोळीने दिल्ली, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळसह अनेक राज्यांमधील अनेक लोकांना फसवल्याची माहिती आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीने त्यांची ५० कोटी रुपयांपर्यंत फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विल्लुपुरम आणि तिरुप्पूर सारख्या शहरांमध्येही या कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
4000 लोकसंख्येचं गाव, 1000 यूट्यूबर्स! प्रत्येक जण आहे डिजिटल स्टार, कमाई ऐकून व्हाल थक्क
या प्रकरणात आता टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना आणि काजलचेही नाव पुढे आले आहे. कारण तमन्ना त्या कंपनीच्या लाँच इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तर दुसरीकडे, काजलने त्याच कंपनीसाठी दुसऱ्या कॉर्पोरेट कार्यक्रमात भाग घेतला. यासाठी दोन्ही अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तूही देण्यात आल्या होती. पोलिसांनी काजल आणि तमन्ना यांच्याकडून उत्तरे मागितली आहेत की ते फक्त कंपनीसाठी कार्यक्रमांना पाठिंबा देत होते की त्यांचा काही आर्थिक सहभाग होता. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीने २०२४ मध्येच ३० कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
“अ परफेक्ट मर्डर”चा होणार महिलांसाठी विशेष प्रयोग, जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार ?
यापूर्वी, रायपूर पोलिसांनी फसवणुकीत सहभागी असलेल्या इम्रान पाशाला अटक केली होती. यानंतर, पॉंडेचेरी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोईम्बतूरमध्ये लपून बसलेल्या नितीश जैन आणि अरविंद यांना अटक केली. त्याला पॉंडेचेरी येथे आणण्यात आले आणि बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोबाईल फोनसह महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांना अटक करण्यासाठी पोलिस सक्रियपणे काम करत आहेत.