फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सध्या बॉलिवूडमध्ये जुने चित्रपट रि- रिलीज करण्याची तुफान क्रेझ आहे. पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ चित्रपट ९ वर्षांनी पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘कहो ना प्यार है’, ‘रहेना है तेरे दिल मै’, ‘तुझे मेरी कसम’ असे अनेक चित्रपटही गेल्या काही महिन्यांपूर्वी पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आणि या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आता माधुरी दीक्षितचा २८ वर्षांपूर्वीचा एक चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला थिएटरमध्ये येणार आहे.
३१ ऑक्टोबर १९९७ रोजी रिलीज झालेला ‘दिल तो पागल हैं’ चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी दीक्षितने शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. याशिवाय माधुरी आणि करिश्माचा एक डान्स फेस ऑफ सुद्धा प्रेक्षकांना यामध्ये पाहायला मिळाला होता. ९० च्या दशकामध्ये रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटाला त्याकाळात अनेक नामांकित पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये,‘सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर’, ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ आणि ‘लोकप्रिय चित्रपट’ असे ३ राष्ट्रीय पुरस्कार तर, वेगवेगळ्या कॅटगरीमध्ये ८ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले होते. आपल्या काळात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ह्या चित्रपटाने २८ वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट सज्ज झालं आहे.
गोविंदा- सुनीता अहुजाचा घटस्फोट होणार ? अभिनेत्याच्या वकिलाने सर्व काही सांगून दिले
‘यशराज फिल्म्स’ने अधिकृत पोस्ट शेअर करत ‘दिल तो पागल हैं’ येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार, अशी माहिती दिली आहे. यामध्ये माधुरी दीक्षित, शाहरुख खान, करिश्मा कपूर, अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. असंख्य नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत चित्रपट पाहण्यासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा हुसेन स्टारर ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाची जादू सध्या थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे. पण आता बॉलिवूडचा किंग शाहरुख स्वतः त्याच्या चित्रपटाशी स्पर्धा करण्यासाठी मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटगृहात परतल्यानंतर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कसा कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.