दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिाया येताना दिसत आहे. ‘डंकी’ नं पहिल्या दिवशी संथ सुरुवात केली होती तर दुसऱ्या दिवशी सालार सारख्या सिनेमानं टक्कर दिल्याने चित्रपटाला समाधानकारक कमाई करता नाही आली. तरीही प्रेक्षकांच्या प्रेमामुळे डंकी बॅाक्स ऑफिसवर अजुनही टिकून आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या कोणीसाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. जाणून घ्या चित्रपटाने एकोणीसाव्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर (Dunki Box Office Collection Day 20) किती कमावले.
[read_also content=”प्रभासच्या ‘सालार’ची बॅाक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच, एकोणीसाव्या दिवशी कमावले 2.2 कोटी! https://www.navarashtra.com/latest-news/salaar-box-office-collection-day-14-is-2-2-crore-nrps-496798.html”]
डंकी रिलीज होण्याआधी अॅडवान्स बुकींगमध्येही 37 हजारांहून अधिक तिकीटांची विक्री करून या चित्रपटाने 1 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यावरुन चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, डंकीने पहिल्याच दिवशी 29.2 कोटींची कमाई केली. सोबत बॉक्स ऑफिसवर खाते उघडले. सालारला टक्कर देत डंकीनही 100 कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. चित्रपट रिलीज होण्याच्या विसाव्या दिवशी 1.30 कोटी कमावले. तर, एकंदरित या चित्रपटाने आतापर्यंत 219.27 कोटी कमावले आहेत.
जवान,पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहे. डंकीमध्ये चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इंग्लडंला जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे व्हिजा,पासपोर्ट नसताना ते अवैध पद्धतीने इंग्लडंला जातात. या चित्रपटात कॉमेडी आहे, खूप इमोशन आहे आणि थोडी अॅक्शनही आहे.