Nilu Phule Daughter Gargi Phule Talk About Bai Wadyavar Ya Dialogue Said It Was Not My Father Dialogue
‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग सोशल मीडियासह सर्वत्र कमालीचा चर्चेत राहिलेला आहे. या डायलॉगचा वापर फक्त चाहत्यांकडूनच केला जात नाही तर, सेलिब्रिटींकडूनही अनेकदा स्कीटमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. शिवाय अनेकदा सोशल मीडिया इन्फ्लूएंसरकडूनही या डायलॉगचा वापर केला जातो. ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग साधा ऐकू आला तरी किंवा वाचला तरी आपल्या डोक्यात चटकन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. स्वर्गीय अभिनेते निळू फुले यांची लेक आणि सुप्रसिद्ध मराठी टिव्ही अभिनेत्री गार्गी फुले यांनी या डायलॉगबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत त्या डायलॉगवर भाष्य केलंय.
मन मोकळं, मूड आणि ट्रॅव्हल मोड ऑन करणारं ‘होऊया रिचार्ज’ गाणं रिलीज, नक्कीच येईल मैत्रीची आठवण
अभिनेते निळू फुले यांच्या डायलॉगची, त्यांच्या दमदार अभिनयाची आणि त्यांच्या भारदस्त लूकची कायमच जोरदार चर्चा होते. पण त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत राहिलेला डायलॉग म्हणजे, ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग होय. या डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होते. पण हा डायलॉग निळू फुलेंच्या कोणत्या चित्रपटातील आहे, हे कोणाला ही माहिती नाही. नुकतंच ‘वास्तव कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री गार्गी फुलेंनी त्या डायलॉगबद्दल भाष्य केलंय केलं आहे. त्यांनी त्या मुलाखतीत हा डायलॉग खरंच आहे का? या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय.
‘हिरामंडी’तील आलमजेब होणार लवकरच आई, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी बनणार आजोबा
मुलाखतीत गार्गी फुले म्हणाली की, “बाबांनी कोणत्याही चित्रपटात ‘बाई वाड्यावर या’ असा डायलॉग मारलेला नाही. मला शोधून दाखवा. मी अनेकदा काही लोकांना म्हणालीये की, बाबांचा तो डायलॉग तुम्ही शोधून दाखवा. मी सुद्धा शोधते. मी बाबांचे अनेक चित्रपट बघितलेय, पण मला ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग बाबा कोणत्याही चित्रपटात म्हटलेला दिसत नाही. मला त्याची हीच प्रतिमा मोडायची आहे. नवीन पिढीला जर निळू फुले कळायचे असतील, तर बाबाची फक्त ‘बाई वाड्यावर या’ ही प्रतिमाच नाही. त्याने समाजकार्य केलं आहे. अनेक वर्ष त्यासाठी त्याने लढा लढला आहे.”
“दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं…” Ex पतीच्या निधनानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेची पहिली प्रतिक्रिया
निळु फुलेंच्या सिनेसृष्टीतील समाजकार्याबद्दल गार्गी फुलेंनी सांगितले की, “चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी मिथुन चक्रवर्ती आणि बाबा असे त्या काळचे अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र येत त्यांनी लढा उभा केला. तो लढा लोकांपर्यंत पोहोचतच नाही आणि तेव्हा आम्ही हे केलं असं सांगण्याची वृत्तीही नव्हती. त्यामुळे मला वाटतं हे सगळं लोकांना कळलं पाहिजे. म्हणूनच मी बाबांच्या जीवनावर बायोपिक करण्याचा विचार करत आहे. जेव्हा प्रसाद ओक माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की, निळूभाऊंवर बायोपिक करूया का? तर मला सुरुवातीला वाटलं की काय गरज आहे. बाबाला स्वतःलाच ते कधी आवडलं नसतं.”
“दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं…” Ex पतीच्या निधनानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेची पहिली प्रतिक्रिया
मुलाखतीच्या शेवटच्या भागात गार्गी फुलेंनी सांगितलं की, “यामुळेच त्याने केव्हा स्वत:चं आत्मचचरित्र वगैरे लिहिलं नाही. त्यात खोटं लिहिणं वैगेरे, मला जमणार नाही आणि जे खरं लिहीन ते लोकांना आवडणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यापेक्षा न लिहिलेलं बरं. त्यामुळे मी आधी नको म्हणाले. पण नंतर मी विचार केला की, त्याची फक्त ‘बाई वाड्यावर या’ हिच प्रतिमा नाही. त्याच्यापुढे ही तो खूप वेगळा आहे. त्यामुळे लोकांना आणि नवीन पिढीला कळण्यासाठी मला हे केलं पाहिजे. म्हणून मी प्रसादला म्हटलं की, चल बाबावर बायोपिक करुयात.”