Actress Ankita Raut Confess Love And Shares Photo With Partner On Instagram
‘नाखवा वल्हव होरी’ आणि ‘गोमू बाजाराला’ सह अशा अनेक कोळी गीतांतून लोकप्रिय झालेली अंकिता राऊत आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी अंकिताने “आयुष्याचा जोडीदार म्हणून एक असा हात धरलाय… जो मला कधीच काही कमी पडू देत नाही…” असं म्हणत तिने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. आता अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर लाईफ पार्टनरसोबतचा फोटो शेअर केलेला आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर…’
अंकिता राऊतने इन्स्टाग्रामवर खास कॅप्शन लिहून इन्स्टाग्रामवर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अमृत कोंडे असं असून ते एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने प्रेमाची कबुली देताना लक्षवेधी कॅप्शन दिले आहे. तिच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधलेय. “एकमेकांसाठी अनोळखी होतो मग हळुहळू एकमेकांचे मित्र झालो. पुढे, मित्र ते बेस्ट फ्रेंडपर्यंतचा प्रवास केला आणि आता आम्ही बेस्ट फ्रेंड्स ते लाइफ पार्टनर्स हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालो आहोत… Found My Forever” असं म्हणत अंकिताने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
अंकिता राऊतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना तिने तिच्या जोडीदारासोबतच अनेक फोटोही शेअर केले आहेत. अंकिताने शेअर केलेल्या पोस्टप्रमाणे तिची आणि अमृतची ओळख फार जुनी असल्याचं पाहायलं मिळत आहे. मैत्रीपासून ते एकमेकांचे लाईफ पार्टनर पर्यंत त्यांचा प्रवास आहे. दरम्यान, अंकिता राऊतने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. गायिका सोनाली सोनावणे, सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री तृप्ती राणे, निकिता सावंत यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत अंकिताला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अनेक चाहत्यांनीही अंकिता आणि अमृताला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री अंकिता राऊत कोळी गाण्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिने आजवर अनेक म्युझिक अल्बम्समध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले आहे. तिच्या गाण्यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते. याशिवाय अंकिता झी युवावरील ‘अप्सरा आली’ कार्यक्रमातही सहभागी झाली होती. शिवाय, ती एक प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लूएंसरही आहे. अंकिता राऊतने बालकलाकार मायरा वायकुळ आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम सिंबा म्हणजेच साईराज केंद्रेसोबत ‘देवबाप्पा’ या गाण्यात सुद्धा काम केले होते.