hemant dhome slams censor board as cbfc officers
महेश बनसोडे दिग्दर्शित ‘चल हल्ला बोल’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वरुण राणा दिग्दर्शित ‘चल हल्ला बोल’ चित्रपट पद्मश्री, बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची गेल्या काही वर्षांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतल्याचा दावा चित्रपटाच्या टीमने केला आहे.
बिपाशा बासूला काम का मिळत नाहीये? मिका सिंगने जरा स्पष्टच सांगितलं…
सेन्सॉर बोर्डाने या कविता चित्रपटातून हटवण्यास सांगितलं आहे. कविता आक्षेपार्ह असल्याचं म्हणत चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची अट सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांसमोर ठेवली आहे. इतकंच नाही तर त्यांनी थेट ‘कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही’ असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सध्या सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?”
हा प्रश्न विचारणारा, आणि अनेकांना खटकणारा पॅंथर होते नामदेव ढसाळ!
आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर ठणकावून सांगा…
समता आणि मानवतेचा प्रसार करणारे पॅंथर होते नामदेव ढसाळ!
महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला…… pic.twitter.com/ijebXMULe4
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) March 1, 2025
अभिनेता हेमंत ढोमेने या घटनेवरून पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्याने एक्सवर (ट्वीटर) एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तो म्हटला आहे की, “ “जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?” हा प्रश्न विचारणारा आणि अनेकांना खटकणारा पँथर होते नामदेव ढसाळ! आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर त्यांना ठणकावून सांगा… समता आणि मानवतेचा प्रसार करणारे पॅंथर होते नामदेव ढसाळ! महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला… बहुजनांचा नायक, अफाट वैश्विक महाकवी होता ‘नामदेव ढसाळ’. आपण ठणकावून सांगितलं तर आणि तरंच हे चित्र बदलेल! नुसता एक माणूस हाकलून चालणार नाही, आख्खी व्यवस्थाच बदलावी लागणार आहे. या नायकाने पेटवलेली माणसं पुन्हा पेटवावी लागणार!”
‘तारक मेहता’मधला ‘मिस्टर अय्यर’ ४४ व्या वर्षीही आहे अविवाहित, अभिनेत्याने खरं कारण सांगत केला खुलासा
१ जुलै २०२४ रोजी हा चित्रपट मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरलं होतं. पण, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने तो रखडला आहे. ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपटाची कथा दलित पँथर, युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित आहे. या चित्रपटात पद्मश्री कवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे. पण, कवितेत शिव्या आहेत, अश्लीलता आहे, असे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडलंय.