Holi Special Marathi Movies And Web Series Watch On Ultra Jhakas OTT App
मार्च महिन्यात होळीच्या रंगांसोबत तुमच्या मनोरंजनाच्या रंगात सुद्धा भर घालूया, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर एका पेक्षा एक सुपरहिट मराठी कंटेंट घरबसल्या पाहूया. मराठी भाषेतील नवे कोरे सिनेमे, वेब सिरीज आणि साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट मराठीत डबमध्ये आता तुम्हाला पाहता येणार आहेत. चला तर मग, मराठी मनोरंजनाचा आनंद घेऊ आणि सणाच्या आनंदात रंग भरू…
‘स्वप्नातली परी की तिखी छूरी…?’ ब्रेकअप नंतर तमन्नाचा कातिलाना Look “कतई जहर…”
‘राख’ – गुन्हेगारी, राजकारण आणि सत्याचा खेळ!
अल्ट्रा झकास ओरीजनल वेब सिरीज ‘राख’ हि एक क्राईम, थ्रिलर वेब सिरीज आहे. हि सिरीज २८ मार्च २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येणार आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केले आहे. हि सिरीज अशी आहे जिथे न्याय हा केवळ सत्ताधाऱ्यांचा खेळ असतो. या कहाणीत एका हत्येचा तपास फसवणूक, राजकीय कटकारस्थानं आणि सूडाच्या चक्रव्यूहात अडकलेला दाखवण्यात आलेला आहे. शिवाय या वेब सिरीजमध्ये अजिंक्य राऊत, गौरी नलावडे, रोहित कोकाटे, मिलिंद शिंदे, मिलिंद दास्ताने, चैतन्य देशपांडे, ऋतुराज शिंदे, नेहा बाम, विनायक चव्हाण, कृष्ण रघुवंशी यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.
सलमान सोसायटी – संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाचं महत्त्व सांगणारी कहाणी
‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट शिक्षणाच्या विषयावर भाष्य करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलास काशिनाथ पवार यांनी केले असून या चित्रपटाचा या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ०७ मार्च २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येणार आहे. या प्रेरणादायी चित्रपटात तीन एकत्र एका सोसायटीत राहणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या संघर्षांची हृदयस्पर्शी कहाणी दाखवण्यात आली आहे. दरम्यान त्या कुटुंबांना येणाऱ्या विविध अडचणी आणि त्या अडचणींवर मात करताना मुलांनी दाखवलेली जिद्द आणि धैर्य हे या चित्रपटाचे मूळ उद्दिष्ट आहे.
वऱ्हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार क्रेझ…
Locked – ( लॉक्ड ) – एका बंदिस्त वाड्याचं गूढ रहस्य
‘लॉक्ड’ हि एक तेलुगू क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रदीप देवा कुमार यांनी केले असून हि वेब काही अनोळखी लोकांची आहे. ज्यात एक व्यक्ती आपली ओळख घेऊन फिरतो आणि त्यापैकी दोन चोर आणि काही दुर्दैवी लोकं. त्या सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर यायचं असतं पण येण्याचा कोणताच मार्ग सापडत नसतो आणि परिस्थिती दिवसेंदिवस बेताची होऊन जाते. पण त्यापैकी एक मास्टरमाइंड पुढे येतो आणि सर्व बदलून जातं. या सिरीज १४ मार्च २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. हि कथा एका मोठ्या वाड्यात अडकलेल्या थरारक प्रवासातून कोणाची सुटका होणार? की या वाड्याचे गूढ कायम त्यांना आपल्यासोबत ठेवणार.
टोपीवाले कावळे – राजकीय व्यवस्थेवर तिखट व्यंग आणि धमाल विनोदाची कमाल
‘टोपीवाले कावळे’ हा एक मराठी राजकीय विषयांवर भाष्य करणारा चित्रपट आहे, जो महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा निर्धार करणाऱ्या काही सामान्य लोकांच्या संघर्षाची कहाणी सांगतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून हा चित्रपट २१ मार्च २०२५ रोजी पहिल्यांदाच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. या चित्रपटात प्रचार मोहिमेतील अडथळे आणि जनतेचे समर्थन जिंकण्यासाठी वापरलेल्या युक्त्या विनोदी शैलीत सुरेखपणे दाखवण्यात आलेल्या आहेत.