(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
८० च्या दशकात प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो ‘द कॉस्बी शो’ मध्ये थियो हक्सटेबलची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेता माल्कम-जमाल वॉर्नर आता आपल्यात नाहीत. या अभिनेत्याचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. कोस्टा रिकाच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहताना त्यांचा अपघात झाला. या बातमीने आता सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या या दुर्दैवी अपघाती मृत्यूवर चाहते दुःख व्यक्त करत आहेत.
माल्कमचा मृत्यू कसा झाला?
कोस्टा रिकाच्या न्यायिक तपास संस्थेनुसार, रविवारी दुपारी वॉर्नर लिमोन प्रांतातील प्लाया ग्रांडे डे कोकालेस समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात पोहत असताना ही घटना घडली. अचानक आलेल्या तीव्र समुद्राच्या प्रवाहाने त्याला खोल पाण्याकडे ओढले असे सांगण्यात येत आहे. समुद्रात बुडल्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी वॉर्नरला बाहेर काढले, परंतु आपत्कालीन सेवा म्हणजेच कोस्टा रिका रेडक्रॉस टीम पोहोचेपर्यंत त्याने शेवटचा श्वास घेतला होता. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आणि अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला.
तारा आणि वीर पहारिया खरंच करतायत एकमेकांना डेट? दोघांचे ‘हे’ कृत्य पाहून सोशल मीडियावर उडाली खळबळ
८० च्या दशकात वॉर्नर प्रेक्षकांचा आवडता अभिनेता
१९८४ ते १९९२ पर्यंत चालणाऱ्या लोकप्रिय सिटकॉम ‘द कॉस्बी शो’ मध्ये थियो हक्सटेबलची भूमिका साकारल्यानंतर माल्कम-जमाल वॉर्नर प्रत्येक अमेरिकन घराघरात प्रसिद्ध झाले. या शोमध्ये ते डॉक्टर हक्सटेबलचे धाकटे पुत्र होते. थियोची भूमिका साकारणारा वॉर्नर केवळ एक उत्तम अभिनेता नव्हता तर नंतर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्याने आपला ठसा उमटवला. त्याच्या कामाने प्रेक्षकांना नेहमीच खुश केले आहे.
The Gentle Giant
A poem and tribute to our beloved brother Malcolm-Jamal WarnerToday, we lost a gentle giant.
A man who won our hearts not by force, but by quiet grace.
From the very beginning, Malcolm-Jamal Warner reminded us that being calm, classy, sophisticated, and soulful… pic.twitter.com/1tUkY5QZ3q— Tyrese Gibson (@Tyrese) July 21, 2025
हॉलिवूडमध्ये दुःखाची लाट
माल्कम-जमाल वॉर्नरची बातमी पसरताच हॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली. अभिनेता आता आपल्यात नसला तरी त्याचे काम आणि चित्रपट नेहमीच चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहे.