भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक, इरफान खान यांचं 2020 मध्ये कर्करोगाने निधन झालं. सोमवारी नेटफ्लिक्सच्या फिल्म्स डे इव्हेंटमध्ये, बाबिलने सांगितले की स्क्रिप्ट वाचण्यापूर्वीच त्याला “काला” मध्ये काम करायचे होते, परंतु ऑडिशन्स दरम्यान वडिलांचे निधन झाल्यानं तो निराश झाला होता. तो म्हणाला, “माझा एक जवळचा मित्र अन्विताचा सहाय्यक आहे आणि मी स्क्रिप्ट वाचण्यापूर्वी मला चित्रपट करायचा होता. मला त्याबद्दल दुसरा विचार कधीच आला नव्हता आणि मी ऑडिशनसाठी तयार होतो. हीच ती वेळ होती जेव्हा बाबांचं निधन झालं आणि मी खचलो आणि खूप उदास झालो.”
अभिनेत्याने पत्रकारांना सांगितलं, “जेव्हा मी क्लीन स्लेट (प्रोड्यूसर हाऊस) फिल्म्समध्ये पोहोचलो तेव्हा त्यांनी माझ खूप सांत्वन केलं. दत्त यांनी माझी खूप काळजी घेतली. मी त्यांचे पुरेसे आभार मानू शकत नाही. त्यांनी मला ज्या प्रकारे मिठी मारली ती अमूल्य होती.” तृप्ती डिमरी अभिनीत, ‘काला’ हा चित्रपट “आईच्या प्रेमासाठी आसुसलेल्या मुलीच्या हृदयद्रावक कथेवर” आधारित आहे.