Heart Broken Hina Khan Apologize To All The Hindus For The Pahalgam Terror Attack
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. २२ एप्रिलला झालेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांवर निशाणा साधण्यात आला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ने घेतली होती. त्या २६ जणांमध्ये, दोन विदेशी, दोन स्थानिक आणि २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कलाकार मंडळीही या हल्ल्याविषयी तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री हिना खान हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत येऊन हिना खानने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये हिना खानने मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते, अशी पोस्ट लिहून तिचं मत व्यक्त केलंय.
Kunal Kamra: मुंबई उच्च न्यायालयाचा कुणाल कामराला दिलासा! अटकेपासून स्थगित, तपास राहणार सुरू!
हिना खानने पहलगाम हल्ल्यानंतर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री म्हणाली की, “हा एक काळा दिवस आहे. माझे डोळे पाणावले असून माझे हृदय जड अंत:करणाने भरुन आले आहेत. आपण आपल्या भावना तोपर्यंतच व्यक्त करतो जोपर्यंत आपल्या डोळ्यात सत्य खूपत असते. जर आपण सत्य स्वीकारण्यात अपयशी ठरलो तर काहीच अर्थ उरत नाही. हा हल्ला अत्यंत क्रूर आणि अमानवी वृत्तीच्या दहशतवाद्यांनी केला आहे जे स्वतःला मुस्लिम म्हणवतात. या गोष्टीने मला खोलवर हादरवून जर धर्माच्या आधारावर कोणत्याही मुस्लिमाची अशा प्रकारे हत्या झाली तर ते किती वेदनादायक असेल याची कल्पनाही करू शकत नाही. त्या कल्पनेनेच माझे हृदय तुटेल. विशेष म्हणजे जर आपण मुस्लिम असल्याने घडलेल्या गोष्टी नाकारत राहिलो, तर फक्त सोशल मीडियावरील काही ट्वीट्स एवढंच आपलं अस्तित्व उरेल.”
दुसऱ्या पोस्टमध्ये हिनाने स्पष्टपणे म्हटले आहे की, “मी एक मुस्लिम आहे आणि एक माणूस म्हणून मला लाज वाटते. या क्रूरतेने ज्यांचे हृदय तुटले आहे अशा सर्वांची मी माफी मागते. पण मला हे देखील सांगायचे आहे की, ज्याला कोणताही धर्म नसतो त्याने हे केलंय. तो कोणत्याही धर्माचा असला तरी, त्याचा मानवतेशी काहीही संबंध नव्हता. तो मुस्लिम असू शकत नाही.” हिनाने आपल्या पोस्टमध्ये असंही म्हणाली की, “माझा देश माझ्या रक्तात आहे. मी एक भारतीय मुस्लिम आहे जी संविधानावर, देशाच्या सशस्त्र दलांवर आणि भारतीयत्वावर विश्वास ठेवते. अशा दहशतवाद्यांविरुद्ध कोणतीही सौम्यता बाळगू नये, असे त्यांनी कडक शब्दात सांगितले. “मला ही घटना पूर्णपणे आणि निर्भयपणे आवडत नाही,” असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
ब्रेस्ट कॅन्सर वेदनेदरम्यान Tahira Kashyap परतली कामावर, म्हणाली – ‘पिक्चर अभी बाकी हैं…’
हिना खान मुळची काश्मिरी आहे, तिने तिसऱ्या पोस्टमध्ये आपल्या मूळ गावचे बदलते चित्र चाहत्यांसमोर मांडले. तिने लिहिले की, जे लोक अजूनही काश्मीरला दहशतवाद आणि फुटीरतावादाचे प्रतीक मानतात ते सत्यापासून खूप दूर आहेत. हिनाने लिहिले की, “आजचे काश्मीर बदलले आहे. आता येथे ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या जातात, मुले हातात तिरंगा घेऊन अभिमानाने चालत आहेत.” अभिनेत्रीने असेही म्हटले की आता काश्मिरी पंडित परत येत आहेत आणि काश्मीरला पुन्हा ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ बनवण्याचा प्रयत्न आहे, कोणाचे कब्रस्तान नाही. हिनाने लिहिले की, काश्मीरला आता हल्ल्यांची नाही तर पाठिंबाची गरज आहे. आपल्याला इथे पर्यटन हवे आहे, दहशतवादाची नाही. आपल्याला बंधुत्वाची गरज आहे, विभाजनाची नाही.
शेवटी हिनाने लिहिले, “मला न्याय हवा आहे. एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून आणि एक मुस्लिम म्हणून. मी माझ्या सर्व हिंदू बांधवांची माफी मागते. ही घटना खूप वेदनादायक आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी मी दुःखी आहे. पहलगाममध्ये जे काही घडलं, ते विसरणं अशक्य आहे.” अशाप्रकारे हिना खानने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्यात. याशिवाय सर्व हिंदू बांधवांची माफी मागितली आहे. याशिवाय “आम्ही सर्व भारतीय एक आहोत. आमच्यात फूट पाडू नका. आता फक्त एकच ओळख असावी भारतीय. धर्म नाही, राजकारण नाही. फक्त मानवता आणि एकता. जय हिंद.”, असंही आवाहन हिना खानने केलं आहे.