करण जोहरच्या मुलाने दिले असं उत्तर की...(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, बहुतेक वेळा लोक त्याला Nepotism बद्दल खूप ट्रोल करतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याची यासंदर्भात चर्चा होत आहे. मात्र करण कधीही या गोष्टीला बधला नाहीये. याशिवाय करण नेहमीच आपल्या मुलाचे आणि मुलीचेही व्हिडिओ शेअर करत असतो आणि त्याची दोन्ही मुलं त्याला अशी उत्तरं देतात की त्याची बोलती बंद होते.
आता नुकताच त्याचा मुलगा यश जोहरने त्याला असे काही उत्तर दिले आहे की, करणने लगेचच व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत असून बॉलीवूडमधील अनेक मित्रमैत्रिणींनीही करणची आता पुन्हा मस्करी करायला सुरूवात केली आहे आणि या व्हिडिओच्या खाली त्याने हेदेखील म्हटलं आहे की, हे उत्तर त्याने त्याच्या मुलाला शिकवलेलं नाही तर त्याने स्वतः दिलं आहे. यावरून त्याच्या मुलामध्ये उपजतच टॅलेंट असल्याचं दिसून येत आहे.
करण जोहर अनेकदा त्याच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. युजर्सना निर्मात्याच्या मुलांचे व्हिडिओदेखील आवडतात. अलिकडेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याचा मुलगा यशचा व्हिडिओ शेअर केला आहे. काही तासांतच या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये करण जोहरचा मुलगा यश जोहर निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसतोय. व्हिडिओमध्ये करण जोहरने त्याच्या मुलाला विचारले की तो Nepo Kid आहे का, तेव्हा यशने यावर खूपच मजेशीर उत्तर दिलं आणि पळून गेला.
करणने यशला नेपो किडबाबत विचारले असता, यश म्हणाला, ‘हो पण मला लाँच व्हायचे नाही’. व्हिडिओ शेअर करताना करण जोहरने सांगितले की कोणीतरी त्याच्या मुलाला हा टी-शर्ट भेट दिला आहे, परंतु यशने हा टी-शर्ट कोणी दिला हे सांगण्यास नकार दिला आहे. करण जोहरला अनेकदा घराणेशाहीसाठी ट्रोल केले जात असले तरी, यावेळी त्याच्या मुलाचा हा गोंडस व्हिडिओ युजर्सकडून खूप पसंत केला जात आहे.
यावेळी यशला करण पुन्हा म्हणाला की ‘पण तुला आता कोण लाँच करतंय’, हे उत्तर ऐकून न घेताच यश धूम ठोकून पळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा अत्यंत मजेशीर व्हिडिओ फारच थोड्या वेळात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.