बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज लाखोंच्या हृदयाची धडकन बनलायं. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार असतात. कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. याशिवाय तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत होते. पण, आता दोघेही वेगळे झालेत. त्याचवेळी, ब्रेकअपनंतर आता सारा क्रिकेटर शुभमन गिलसोबत डिनर करताना दिसली. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा होतीये. दरम्यान, कार्तिक आर्यनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत मोठा खुलासा केलायं.
अलीकडेच ‘फिल्म कम्पेनियन’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत मोठा खुलासा केलायं. तो म्हणाला, ‘ मी खरं तर तो एक वर्षासाठी सिंगल आहे.’
या मुलाखतीत कार्तिकला विचारण्यात आलं की, जुन्या मुलाखतींमध्ये तो रिलेशनशिप स्टेटसबद्दल खोटं बोलतो का, त्यावर सुरुवातीला कार्तिकने या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. पण, नंतर तो म्हणाला, ‘तो सध्या पूर्णपणे सिंगल आहे.’ कॉफी विथ करणचा उल्लेख कार्तिकसमोर झाला, त्यानंतर तो म्हणाला, ‘गेल्या दीड वर्षांपासून मी सिंगल आहे. मला बाकी काही माहीत नाही.’
कार्तिक आर्यनला पुढे विचारण्यात आलं की, तो इतक्या अचूक पद्धतीने दीड वर्षाचा काळ सांगत आहे का? यावर अभिनेता सुरुवातीला काहीच बोलला नाही आणि हसायला लागला. पण नंतर त्याने आपले विधान बदललं आणि म्हणाला, ‘मी गेल्या 1 वर्षांपासून अविवाहित आहे.
‘लव्ह आज कल 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा आणि कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. या चित्रपटानंतर दोघही वेगळे झाले.