आपल्या अभिनयनाने सिनेसृष्टीवर आपली छाप पाडणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या चित्रपटाचे, अभिनयाचे लोकं आजही चाहते आहेत. त्यांच्या पावलावर पाऊन ठेवतं त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे सिनेसृष्टीत आला. आता अभिनयनंतर (Abhinay Berde ) आता त्याची बहिण स्वानंदी बेर्डे ही अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्वानंदी ‘मन येड्यागत झालं’या रोमँटिक मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुमेध मुदगलकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे.
[read_also content=”आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा रुपेली पडद्यावर, ‘मायलेक’ चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस! https://www.navarashtra.com/movies/maylek-news-poster-released-the-movie-based-on-bond-between-mother-and-doughtier-nrps-509053.html”]
मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेनं सिनेसृष्टीत पदापर्ण केलंय. अनेक चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आता त्याची बहिण स्वांनदी बेर्डे सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘मन येड्यागत झालं या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला. या चित्रपटात मालिका तसेच चित्रपटात झळकलेला चेहरा सुमेझ मुदगलकर मुख्य भुमिकेत आहे. यासोबतच अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. स्वानंदी आणि सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन’ अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी आणि कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.






