"आपला मतदानाचा हक्क बजावा..." बिग बॉस फेम अभिनेत्याचे चाहत्यांना आवाहन
महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी अर्थात उद्या निवडणूका होणार आहेत. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अनेक कलाकार वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देताना दिसले. सोशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती केली जात आहे. अशातच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मराठमोळे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. अशातच बिग बॉस मराठी ३ फेम विकास पाटीलने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत राज्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
‘साहिबा’ गाण्यासाठी अभिनेत्री राधिका मदनने काय तयारी केली ? केला स्वत: खुलासा
शेअर केलेल्या पोस्टमध्ये विकास पाटील म्हणतो, “काल महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या… आचारसंहिता लागू झाली. माझ्या मामांच्या प्रचारनिमित्त कोल्हापूर राधानगरी तालुक्यात फिरण्याची आणि लोकांशी संवाद साधायची संधी मिळाली… लोकांमधील उत्साह पाहून छान वाटलं. लोकशाहीच्या या उत्सवाचा भाग होता आलं याचा आनंद वाटला. उद्या तुम्ही सुद्धा मतदान केंद्रावर जाऊन न चुकता मतदान करा आणि संविधानाने दिलेले प्रथम कर्तव्य पार पाडा मित्रांनो… एक सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमचं मोलाचं मत मतपेटीत टाका हीच विनंती करण्यासाठी ही पोस्ट… जय हिंद जय महाराष्ट्र”
दरम्यान, विकास पाटीलच्या अनेक मालिका लोकप्रिय झाल्या. पण तो ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात झळकल्यामुळे अधिक प्रसिद्धच्या झोतात आला. तेव्हापासून विकास नेहमी चर्चेत असतो.