malaika arora and arjun kapoor relationship know how it started
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे, २६ जून १९८५ साली मुंबईत जन्मलेला अर्जुन कपूर फक्त अभिनयामुळेच नाही तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चांगलाच चर्चेत राहिला आहे. अर्जुन कपूर हा लोकप्रिय सिनेनिर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे, तर दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी त्याची सावत्र आई होती. तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या त्याच्या सावत्र बहिणी आहेत. अर्जुन कपूर फक्त चित्रपटामुळेच नाही तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो अनेकदा चर्चेत राहिला आहे.
७ चित्रपट, १ विश्व, अगणित कथा; ‘महावतार युनिव्हर्स’ची भव्यदिव्य घोषणा
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडींमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराचा समावेश होतो. कोणताही कार्यक्रम असो किंवा त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो असोत या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत राहिलीये. मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. इतकंच नाही तर, मलायका अरोरा एका मुलाची आई आहे. मलायका अरोरा तिच्या मुलासोबत राहते. वयाने लहान असलेल्या अर्जुनला डेट करणार्या मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांचं ब्रेकअप झालं असून त्यांनी दोघांनीही आयुष्यामध्ये आपआपले मार्ग निवडलेय.
वय केवळ आकडा! ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स
ट्रोलिंग होऊनही कोणत्याही गोष्टींची अजिबात पर्वा न करता दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. दोघेही अनेकदा एकत्र सुट्टीवर गेलेले स्पॉट झाले होते. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर अर्जुनने तिच्यासोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यावेळी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल माध्यमांना उघडपणे काहीही सांगितले नव्हते. कारण मलायका त्यावेळी अरबाजची पत्नी होती. अर्जुनचे अनेक मित्र मलायकासोबत जोडले गेले होते. करीना कपूर, करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा हे अर्जुनचे मित्र आहेत. अशा परिस्थितीत अर्जुनचं मलायका प्रती प्रेम आणखीनच बहरत जात होतं.
इंदू-अधूच्या संसारात नवं संकट? गोपाळच्या परत येण्याने ‘इंद्रायणी’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट
अर्जुन कपूरच्या ‘इशकजादे’ या पहिल्या चित्रपटाच्या तयारीसाठी अर्जुन जेव्हा सलमान खानला भेटायला जायचा, तेव्हाच मलायका त्याच्या प्रेमात पडली, असे म्हटलं जातं. मलायका अरबाज खानची पत्नी होती, पण २०१७ मध्ये दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेत आयुष्याचा आपआपला मार्ग निवडला. अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने तिचा मुलगा अरहानची कस्टडी घेतली. घटस्फोटानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे नाते सार्वजनिक करत तिने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.