Sai Tamhankar Talks About Her Divorce Party With Ex Husband Amey Gosavi
अफलातून अभिनय आणि कामाच्या चिकाटीच्या जोरावर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही, तर बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं अस्तित्व अभिनेत्री सई ताम्हणकर निर्माण केले आहे. आज 25 जून, अभिनेत्री सई ताम्हणकरचा 38 वा वाढदिवस आहे. छोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारी सई तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचली आहे. सांगली ते मुंबई नक्कीच सई ताम्हणकरचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. आज वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यावर एक नजर टाकूया….
सईचं प्रोफेशनल आयुष्य ज्याप्रमाणे चर्चेत असतं त्याचप्रमाणे तिचं वैयक्तिक आयुष्यदेखील चर्चेचा विषय ठरतो. सईने २०१३ मध्ये अमेय गोसावीसोबत लग्नगाठ बांधली. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही आणि लग्नाच्या दोन वर्षातच म्हणजे २०१५ मध्ये सई आणि अमेयने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर काही वर्षांनंतर सई सिनेनिर्माता अनिश जोगला डेट करत होती. सई, त्याला दौलतराव म्हणून हाक मारायची. मात्र, २०२४ मध्येच सई आणि अनिश यांचा ब्रेकअप झाला. अनिशसोबतच्या ब्रेकअपवर एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने भाष्य केलं होतं. हा निर्णय परस्पर संमतीने घेतला असल्याचं सईने सांगितलं होतं.
Panchayat 4 वेबसीरीज झाली लिक, फ्री डाऊनलोड करण्यासाठी युजर्सने शेअर केल्या लिंक्स
सई आणि अमेयने २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांनी लव्ह मॅरेज केले होते. पण त्यांनी घटस्फोट आपापसातील समजूतीने घटस्फोट घेतला. सईने एका मुलाखतीत तिच्या घटस्फोट घेतानाचा किस्सा सांगितला आहे. सई म्हणाली की, “तुम्ही कोर्टात जाता, घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करतात त्यावेळी तुमची मनस्थिती फारच वेगळी असते. घटस्फोटावेळी कोर्टात दोघांचंही मोठ्याने नाव घेतलं जातं, असं वाटतं जणू आपण बाजारात आहोत. मी तेव्हा माझं नाव बदललं नव्हतं, पण मला कोर्टात सई ताम्हणकर- गोसावी अशाच नावाने हाक मारायचे. जेव्हा तुमचा घटस्फोट होतो त्यावेळी तिथे तुम्हाला तुमच्या लग्नानंतरच्या नावानेच हाक मारली जाते.”
Ultra Jhakas OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार साऊथ थ्रिलरचा धमाका…
पुढे सईने सांगितलं की, “घटस्फोटाच्या विचित्र परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि थोडं चिल करण्यासाठी आम्ही ड्रिंक्स घ्यायला बाहेर गेलो. तिथे आमच्या दोघांची रडारड झाली, थोडं प्रेमाने एकमेकांशी बोललो आणि आयुष्यासाठी एकमेकांना सल्लेही दिले. त्यावेळी आमच्या घटस्फोटाबद्दल जास्त कोणालाही माहिती नव्हतं. फक्त आमच्या जवळच्या मित्रांनाच त्याबद्दल माहित होतं. त्यामुळे ते आमची विचारपूस करण्यासाठी फोन करत होते. ज्यांचे फोन आले, त्यांना ‘आम्ही या ठिकाणी आहोत, तुम्ही इथेच भेटायला या’असं सांगितलं. त्यानंतर आमच्यासोबत तिथे ८-१० लोकं जमले. त्यांच्यासोबत आम्ही दारू प्यायलो, चांगला वेळ घालवला. ज्यादिवशी कोर्टात घटस्फोटाच्या सह्या झाल्या, त्याच दिवशी आम्ही पार्टीही केली.”
प्रसिद्ध अभिनेत्री सना खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आईचे निधन; व्यक्त केले दुःख
मुलाखतीच्या शेवटच्या भागात सई म्हणाली की, “आम्ही आमच्या मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं आणि त्यांना घटस्फोटाबद्दल सांगितलं. त्यादिवशी आम्ही रात्रभर दारू प्यायलो आणि एन्जॉय केलं. आमच्या नात्यात एक प्रकारचा समजूतदारपणा होता. आजही मी केव्हातरी अमेयशी बोलते.” छोट्या पडद्यावरील ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेपासून सईने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. दुनियादारी, नो एन्ट्री, धुराळा, वाय झेड, सनई चौघडे, हंटर सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सईने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर, सुभाष घई दिग्दर्शित ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांची मुख्य भूमिका होती. सईला क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळालाय.