Tejashri Pradhan Shares Birthday Special Post Gratitude Towards Fans And Hint About Comeback
‘होणार सुन मी ह्या घरची’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रसिद्ध झाली आहे. तेजश्री प्रधान मराठी फिल्म इंडस्ट्रीसोबतच ती टीव्ही इंडस्ट्रीतला एक लोकप्रिय चेहरा आहे. तिने मराठी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकप्रिय मालिकेंमध्ये काम केलेले आहे. नाटक, मालिकानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान स्टारर ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ चित्रपटानिमित्त अभिनेत्रीने माध्यमांना मुलाखत दिली आहे.
दरम्यान, तेजश्री प्रधानने ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने लग्नसंस्था, मॅट्रिमोनियल साइट्सबद्दल बोलताना सांगितलं की, “होय, मला दुसऱ्यांदा लग्न करायचे आहे. जर मला माझ्या मनाप्रमाणे आणि मला सुट होईल, असा जर जोडीदार भेटला तर मी नक्कीच दुसऱ्यांदा लग्न करेल. जसजसं आपण पुढे जातो, त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा कमी होत जातात. जर मला, एक खराखुरा, दिलेला शब्द पाळणारा, मला आयुष्यभर साथ देणारा आणि मी त्याची जबाबदारी आहे, असं मानणारा पार्टनर जर भेटला तर नक्कीच मला लग्न करायला आवडेल.”
“…तोपर्यंत मी भारतात लाईव्ह कॉन्सर्ट करणार नाही” दिलजीत दोसांझचा धक्कादायक निर्णय
अभिनेत्री तेजश्री प्रधानचा पहिला घटस्फोट झाला आहे. तिने २०१४ मध्ये अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केलं होतं. त्यांनी लग्नानंतर ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत काम केलं होतं. लग्नाच्या एक वर्षानंतर म्हणजेच २०१५ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. दरम्यान, तेजश्री प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री मराठी चित्रपट आणि टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. अभिनेत्री शेवटची ‘पंचक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर आता लवकरच ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय अभिनेत्री ‘लोकशाही’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.