Abhijeet Chavan Marathi News : अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला हा खूप मोठा धक्का आहे. प्रियाला जाऊन काही दिवस झाले तरीही अजून ही प्रेक्षक आणि सहकलाकारांना या धक्कातून सावरणं अजूनही कठीण होत आहे. मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार हे कॅन्सरने गेले. अभिनेत्री रसिका जोशी, अतुल परचुरे आणि आता प्रिया मराठे बऱ्य़ाच या आणखी अशा बऱ्याच कलाकरांचा कॅन्सरने जीव गेला. प्रियाच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर कोणकोणते कलाकार कॅन्सरने गेले याबाबतचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्युब चॅनेल चुकीची माहिती देत आहे. यातच आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या जाण्याची खोटी बातमी युट्युबवर गेली. याचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत या अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत चव्हाण याच्या निधनाच्या खोट्य़ा बातम्या युट्युबवर व्हायरल झाली. या सगळ्यावर अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. एका युट्यूब चॅनेलने व्हिडीओच्या थंबनेलमध्ये असं म्हटलं आहे की, मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले. या व्हिडीओवर क्लिक केल्यावर आशिष वारंग यांच्या निधनाची बातमी होती. केवळ व्ह्यूज वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत क्रुर कृत्य आहे असं म्हणत अभिजीतने संताप व्यक्त केला आहे.
प्रिया मराठेच्या फोटोसह माझा फोटो एका युट्यूबच्या व्हिडीओचा थंबनेल होता. त्यावर असं लिहिलं होतं की, सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले आहेत. माझ्याच मृत्यूची बातमी मलाच पहायला मिळावी अजून काय पाहिजे?अशा शब्दात अभिजीतने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या अशा अफवा परसवणारी ही काही पहिलीच बातमी नव्हे. याआधीदेखील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी गेल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. हे सगळं पाहता एका अधिकृत वृत्तवाहिनीला मुलाखत देत सगळ्या अफवा आहेत. माझी तब्येत ठणठणीत असल्याचं देखील मोहन जोशी यांनी सांगितलं. एवढंच नाही तर स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम म्हणजेच अभिनेता हर्षद अटकरीचं निधन झाल्याची देखील खोटी बातमी रिल्सच्या स्वरुपात व्हायरल होत होती. त्यामुळे प्रेक्षकांनी या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये असं प्रत्येक वेळी कलाकारांना सांगावं लागत आहे.
अभिजीत चव्हाणच्या कामाबाबत सांगायचं तर सध्या सुरु असलेल्य़ा मुरांबा मालिकेत या अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. मराठी सिनेमा तसंच मालिका आणि नाटकात देखील अभिजीतच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे.