(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्न सराई सुरू आहे. एक पाठोपाठ एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. सुरज चव्हाण, प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी- सोहम बांदेकर असे अनेक सेलिब्रिटि गेल्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता जय दुधाणे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करत सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. आता जयचे केळवण मोठ्या थाट्यात पार पडले. त्याच्या कुटुंबीयांनी जयसाठी खास केळवण समारंभाचं आयोजन केलं होतं. केळवणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वेळी जयचं सर्वांनी स्वागत केल्याचं दिसत आहे. यानंतर त्याचे औक्षण करण्यात आलं. जयला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले. माजघर येथे जयचं केळवण पार पडले. याच्या केळवणाचे फोटो पाहून कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि त्याच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
जयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव हर्षला पाटील असं आहे. गेली काही वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते, शिवाय जयने अलिकडेच त्याच्या प्रेमाची कबुली दिली. जय आणि हर्षला हे दोघे फिरायला गेले असताना अभिनेत्याने त्याच्या हटके स्टाईलमध्ये तिला प्रपोज केलं होते. त्यावेळी हर्षलानंहे त्याला होकार दिला. त्याच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
जय दुधाणे हा बिग बॉस मराठी 3च्या शोमधून घराघरात पोहोचला, तो splitsvilla च्या 13 व्या पर्वाचा विजेता ठरला होता. अशा विविध शोमध्ये तो झळकला आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होते. मात्र काही महिन्यांनी वैयक्तिक कारणास्तव जयने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.






