(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठी चित्रपट चित्रपटगृहात चालत नाही असे म्हटले जाते परंतु अश्यातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाने चित्रपट गृहात यशस्वी 50 दिवसाचा पल्ला गाठला आहे. मराठी चित्रपटसृष्टी साठी ही बाब नक्कीच कौतुक करण्यासारखी आहे. 2024 वर्षात निर्माता म्हणून पदार्पण करणारा स्वप्नील जोशींच्या 2 चित्रपटाने ‘नाच गं घुमा’ आणि ‘नवरा माझा नवसाचा 2’ या दोन्ही कलाकृतीने चित्रपट गृहात यशस्वी 50 दिवसाचा पल्ला गाठला आहे. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून त्याचासाठी ही गोष्ट खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. या दोन्ही चित्रपटात त्याने दुहेरी भूमिका साकारल्या असून स्वप्नील साठी हे वर्ष अजून जास्त खास झाले आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : बिग बॉसच्या मेकर्सच्या निशाण्यावर पुन्हा करणवीर मेहरा! तर दुसरीकडे मैत्रिणीमध्ये तडा
‘नाच गं घुमा’ चित्रपटातून त्याने निर्मिती विश्वात पदार्पण केल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करून आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा 2 मध्ये देखील त्याने मुख्य भूमिका बजावून हा चित्रपट सुपरहिट केला. हाऊसफुल्ल चित्रपट आणि 50 दिवसाचा यशस्वी पल्ला गाठणारे स्वप्नीलचे 2024 मधले हे दोन मुख्य चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटाला चाहत्यांनी चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद दिला आहे. अश्याच त्यांना हे दोन्ही चित्रपट खूप आवडले आहेत. स्वप्नील जोशीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करून त्याचे दोन्ही चित्रपट सुपरहिट केले आहे.
‘नाच गं घुमा’ या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशीसह नम्रता संभेराव आणि मुक्त बर्वे मुख्यभूमीकेत दिसले आहेत. हा चित्रपट घरातील मोलकरीण यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांची कथा हा चित्रपटामध्ये खूप सुंदर पद्धतीत पडली गेली आहे. तर ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटामध्ये अनेक मराठी स्टारकास्टचा समावेश आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटानंतर अनेक काळाच्या प्रतिक्षेनंतर ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : पक्षपात! प्रेक्षक संतापले, अजून किती करणार विवियन डिसेनाला जिंकवण्याचा प्रयत्न?
स्वप्नील कायम चर्चेत असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि अश्यातच पुन्हा एकदा स्वप्नील ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं काही दिवसापूर्वी स्वप्नीलने निर्माता म्हणून अजून एका चित्रपटाची घोषणा केली असून “सुशीला- सुजीत” हा नवा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी “सुशीला सुजीत” या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करणार आहे. स्वप्नीलच्या सोबतीने अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मराठीमधील बडे कलाकार या चित्रपटासाठी निर्माते झाले असून आता या चित्रपटाची स्टार कास्ट काय असणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.