(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या वर्षात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधणात अडकल्याचे आपण पाहिले आहे. आता अजून एक अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरी नुकताच मेहंदी सोहळा पार पडला. याचा खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, ”माझ्या हातावर सुंदर मेहंदी आहे अन् माझ्या मनात तो आहे #HD”असा हॅशटॅग तिने तिच्या पोस्टवर दिला आहे. तसंच तिने कॅप्शनमध्ये अंगठीची इमोजीही पोस्ट केलीय. त्यामुळे ज्ञानदा लवकरच लग्नबंधणात अडकणार असून तिने गुपचूप साखरपुडाही उरकल्याचं बोललं जातय.
प्रेक्षकांच्या लाडक्या काव्याने अजूनही तिच्या नवऱ्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे. तरीही तिने दिलेल्या हिंटमुळे असं समजत आहे. ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव H अक्षरावरून सुरू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्ञानदाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या हातावर मेहंदी अन् हिरवा बांगड्यांचा चुडा पाहायला मिळत आहे. यावर ज्ञानदाने लिहिलं, ठरंल कळवतो लवकरच # HD Love असं कॅप्शन तिने दिलं आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी सेलिब्रिटिंनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, रेश्मा शिंदे, साक्षा गांधी या अभिनेत्रींनी खास कमेंट्स करत तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी ही आनंददायी बातमी ठरली आहे. मात्र, ज्ञानदाचा होणारा नवरा कोण आहे, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ज्ञानदा रामतीर्थकरच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. चाहत्यांमध्ये हेही उत्सुकता आहे की, होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आणि अधिक माहिती तिने कधी जाहीर करणार.तिचे चाहते या बातमीची आतुरतेने वाट पाहत असून सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा जोरदार सुरू आहे. लग्नाबाबत अधिकृत माहिती आणि नवऱ्याची ओळख लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.






