(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.
चित्रपटामधील संवाद, दमदार अभिनय, वास्तवाशी नाते सांगणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘जारण’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने या कथेला भावनिक उंची मिळाली असून, त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर दोघींच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीमुळे चित्रपटगृहात शोज वाढवले जात आहेत आणि प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. कथानकातील सत्यता, भावनांची खोली, आणि उत्तम सादरीकरण यामुळे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
‘Sikandar’ चित्रपटाने १८४ कोटींची कमाई करूनही निर्मात्यांना मोठा तोटा, झाले एवढ्या कोटींचे नुकसान!
चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “‘जारण’ सारखा संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर सादर केला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचा खूप आनंद होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांनी कथा आणि सादरीकरणाचं कौतुक केलं, हे एखाद्या दिग्दर्शकासाठी अत्यंत समाधानकारक आहे. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शाबासकी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देते.” असे ते म्हणाले.
‘Sitaare Zameen Par’ वर सेन्सॉर बोर्डने चालवली कात्री, आमिर खानचे ‘हे’ संवाद हटवले; केले मोठे बदल
निर्माते अमोल भगत म्हणतात, “चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहून मन भरून येते. थिएटर्समध्ये वाढणारे शो, बॉक्स ऑफिसवर वाढती आकडेवारी, आणि सोशल मीडियावरचा सकारात्मक प्रतिसाद हे सर्व पाहाता खरच खूप आनंद होतो. हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे आहे.” असे ते म्हणाले आहे.
अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए ३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’चे लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.