(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अभिनेता सुबोध भावे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे. अभिनयाच्या प्रत्येक भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःसाठी खास स्थान निर्माण केले आहे.
सुबोध भावे याने नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याच्या प्रमुख चित्रपटांमध्ये कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व, लोकमान्य: एक युगपुरुष आणि भावेश जोशी सुपरहिरो यांचा समावेश आहे.
१२ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ आज आपल्या प्रदर्शानाच्या १० वर्षांचा टप्पा गाठत आहे. या विशेष निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून, ती सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च हसत हसत दिले हेल्थ अपडेट म्हणाला, ”डॉक्टरांनी मला..”
पोस्ट शेअर करत सुबोध भावेने लिहिले आहे, “सूर निरागस हो “, 12 नोव्हेंबर 2015 रोजी “कट्यार काळजात घुसली ” हा चित्रपट प्रदर्शित झाला.आज त्याला 10 वर्षे पूर्ण झाली.राहुल देशपांडे यांनी “कट्यार ” नाटकाची निर्मिती केली आणि खरं म्हणजे तिथूनच चित्रपटाची कल्पना डोक्यात आली आणि बघता बघता सगळ्यांच्या साथीने तो पूर्ण झाला. हा चित्रपट म्हणजे भारतीय संगीताचा सोहोळा, माणसाला माणसाशी जोडणारा, नव्या पिढीची आपल्या आधीच्या पिढीशी नाळ जोडणारा. आमच्या संपूर्ण संघासाठी हा आयुष्यभराच्या आनंदाचा सोहोळा.
”लग्नाची एक्सपायरी डेट…”, काजोलचे लग्नाबद्दल मोठं विधान, ट्विंकल म्हणाली, लग्न आहे, वॉशिंग मशीन..’
पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर ,प्रभाकर पणशीकर, पंडित.जितेंद्र अभिषेकी ,पंडित. वसंतराव देशपांडे यांची ही जादूची मैफिल आम्हाला सर्वाना पुढील पिढीपर्यंत पोहोचती करता आली हे आमचं भाग्य. हा प्रवासात सामील असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यभर ऋणात.आणि तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, आशिर्वाद दिले, तुम्हा सर्वावर नितांत प्रेम. जीते रहो गाते रहो. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्या या चित्रपटातील काही खास फोटो शेअर केले आहेत.






