सलमान खान अडचणीत? दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस (Photo Credit- X)
काही महिन्यांपूर्वी एका चिनी कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सलमान खानचा हुबेहूब आवाज तयार केला होता. या आवाजाचा वापर करून बनावट जाहिराती, दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील सामग्री तयार करण्यात आली होती. यामुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Delhi High Court issues notice to Bollywood actor Salman Khan in an application filed by a China-based AI voice generation platform seeking vacation of interim injunction order granting personality rights to the actor. pic.twitter.com/jpJmFLQPGe — Bar and Bench (@barandbench) January 21, 2026
११ डिसेंबर २०२५ रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान खानच्या बाजूने अंतरिम आदेश दिला होता. कोणत्याही व्यक्तीचा आवाज, चेहरा किंवा नाव त्यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक फायद्यासाठी वापरणे हा त्यांच्या ‘व्यक्तिमत्त्व हक्कांचे’ उल्लंघन असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. या आदेशानुसार चिनी कंपनीला सलमानच्या आवाजाचा वापर करण्यास तातडीने मनाई करण्यात आली होती.
“Pushpa 3 मध्ये Salman Khanची एन्ट्री, Allu Arju च्या चित्रपटात काय असेल भाईजानचा रोल? वाचा सविस्तर
उच्च न्यायालयाच्या या बंदीवर चिनी एआय कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली असून त्यांचे म्हणणे असे आहे की, कोणत्याही व्यक्तीचा कृत्रिम आवाज तयार करणे हा एक कायदेशीर व्यावसायिक उपक्रम असून, त्यावर पूर्णपणे बंदी घालणे अयोग्य आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे कंपनीला त्यांचे एआय मॉडेल्स योग्यरित्या विकसित करण्यापासून रोखले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या तांत्रिक संशोधनावर परिणाम होत आहे. एआयद्वारे तयार केलेला आवाज हा मूळ आवाजाची प्रतिकृती असून, तो तांत्रिक प्रगतीचा भाग असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या प्रकरणामुळे आता तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आणि व्यक्तीचे मूलभूत हक्क यावर नवीन चर्चा सुरू झाली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सेलिब्रिटींच्या आवाजाचा किंवा चेहऱ्याचा वापर करून ‘डीपफेक’ तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनीही अशाच प्रकारे आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयीन लढा जिंकला आहे.
चिनी कंपनीने दाखल केलेल्या या आव्हानात्मक याचिकेवर आता न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने सलमान खानला नोटीस बजावून त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा निकाल भविष्यात एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत महत्त्वाचा पायंडा पाडू शकतो.
‘कथा वेगळी होती आणि चित्रपट वेगळाच बनला’, रश्मिका मंदानाने ‘सिकंदर’ बद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली…






