(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
वर्षाचा शेवट जवळ आला असून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर घेऊन येत आहेत अनेक धमाकेदार चित्रपट, जे तुम्हाला मराठी भाषेत पाहायला मिळतील. या चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला अॅक्शन, रोमांचक आणि थ्रिलर्सचा झकास अनुभव घेता येणार आहे. साउथ भाषेतील ‘कुरन’, मराठी चित्रपट ‘डिलिव्हरी बॉय’ आणि हिंदी चित्रपट ‘खलनिग्रहणाय’ हे सर्व चित्रपट तुम्हाला खास मराठीत फक्त ‘अल्ट्रा झकास’वर पाहता येतील.
‘डिलिव्हरी बॉय’ आणि ‘खलनिग्रहणाय’: अल्ट्रा झकासवर डिसेंबरची डबल धमाल!
१२ डिसेंबर २०२५ रोजी मोहसिन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ हा मराठी कॉमेडी-ड्रामा वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसह येत आहे. हा चित्रपट ‘सरोगसी’ या विषयावर आधारित असून चित्रपटात भाऊ आणि चोच्या हे दोघे छोटे-मोठे रिअल इस्टेटचे काम करणारे एजंट असतात. दरम्यान त्यांची डॉ. अमृता देशमुख यांच्याशी भेट होते आणि त्या दोघांच्या जीवनात एक मोठे वळण येते. प्रथमेश परब, पृथ्विक प्रताप, अंकिता लांडे पाटील आणि विजय पाटवर्धन यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट स्वप्नं, संघर्ष, चुका आणि हास्याने भरलेला एक मजेशीर प्रवास ठरतो.
१९ डिसेंबर २०२५ रोजी सुमेश एन. पिल्लै दिग्दर्शित दमदार हिंदी अॅक्शन-थ्रिलर ‘खलनिग्रहणाय’ चित्रपट अल्ट्रा प्ले ओटीटीवर हिंदीमध्ये उपलब्ध असून, प्रेक्षकांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा चित्रपट आता मराठी भाषेत देखील अल्ट्रा झकासवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका कर्तव्यनिष्ठ एसीपीच्या आयुष्यातील थरारक घटना उलगडतो, जेव्हा त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे अज्ञात गुन्हेगारांकडून अपहरण होते. दयानंद शेट्टी, नीता शेट्टी, पलक सिंग आणि आशुतोष पांडे यांच्या प्रभावी अभिनयामुळे हा थरार अधिकच रंगतो—जिथे वडिलांचे प्रेम, पोलिस कर्तव्य, तडाखेबाज अॅक्शन आणि सतत उलगडत जाणारे रहस्य प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सीईओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “हे दोन्ही चित्रपट तुमच्या वर्षअखेरच्या आनंदात भर घालतील आणि तुम्हाला एक वेगळाच, रोमांचक अनुभव देतील. दर वर्षी, दर महिन्याला आणि दर आठवड्याला काहीतरी नवीन देण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे तुमचे मनोरंजन कधीच थांबणार नाही.”






