(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधणात अडकणार आहेत. गायत्री दातार, रेवती लेले या अभिनेंत्रीनी नुकतीच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. या पाठोपाठ मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता तसेच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकमने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच विशाल निकमने त्याच्या आयुष्यात सौंदर्या असल्याचं सर्वांना सांगितलं होतं. आता विशालची सौंदर्या नेमकी कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक गेली अनेक वर्ष आतुरतेने वाट बघत होते. अखेर विशालने त्याच्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पण हा रोमॅंटिक फोटो शेअर करताना अभिनेत्याने तिचा चेहरा रिव्हिल केलेला नाही.
विशालने सौंदर्याची ओळख गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र प्रेक्षकांनी तिला ओळखलेलं आहे. विशाल निकमची सौंदर्या दुसरी तिसरी कोणीही नसून लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे. विशालने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सौंदर्याचा चेहरा दिसत नसला तरीही नेटकऱ्यांनी कमेंट्स मध्ये अभिनेत्रीचे नाव लिहिलं आहे. या पोस्टवर स्वत: अक्षयाने कमेंट करत विशालचं अभिनंदन केले आहे. पण, नेटकऱ्यांनी या कमेंट्स रिप्लायमध्ये , ” आम्हाला माहितीये ही तूच आहेस, सौंदर्या.” अशी कमेंट्स केली आहे.
बिग बॉस मराठी ३’ च्या सीझनमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम लवकरच लग्नबंधणात अडकणार असल्याचा चर्चा सुरू आहेत.सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं मालिकेत काम करतो आहे. दरम्यान, मालिकेत मंजिरीच्या प्रेमासाठी जीवाचं रान करणाऱ्या या रायाला आता त्याच्या खऱ्या आयुष्यातली मंजिरी सापडली आहे.विशाल निकमने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली आहे.






