(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे. अमृताने अनेक मुलाखतीत स्वामी समर्थांचे अनुभव सांगितले आहेत. अमृताने नुकतीच अमुक तमुक चॅनलाल मुलाखत दिली. त्यावेळी तिने स्वामी समर्थांच्या विलक्षण अनुभवाबद्दल सांगितले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अमृता म्हणाली, ” माझं आणि हिमांशु आमचं एक लोखंडवाला इथे घर आहे. आम्ही ते घर घेतलं आणि नंतर कोरोनानं भारतात हाहाकार माजवला. लोखंडवाला एरियातील घर असल्यामुळे EMI पण जास्त होता. हे परवडच नाहीये आम्हाला, असं झालं होतं. मग आम्ही हे घर भाड्याने द्यायचे ठरवले, कारण कोणी विकत पण घेत नव्हतं. कोणी येतच नव्हतं. आम्ही जे सेव्हिंग केले होते त्याचाही तळ आला होता. पुढच्या महिन्यात द्यायला काहीच पैसे नव्हते. कारण ३ वर्ष काम बंद होतं. ”
पुढे अमृता म्हणाली, शेवटी मग एक पार्टी आली, ते फक्त माझं मंदिर बघून गेले. ते म्हणाले, ठीक आहे आपण उद्या पेपर साईन करू. आमच्याकडे पुढच्या महिन्याचा हफ्ता द्यायला सुद्धा नव्हता. आणि त्यांना विचारलं की, तुम्ही का म्हणून हे घर निवडले. तेव्हा पेपर साईन करताना तो माणूस मला म्हणाला, तुमच्या इथे स्वामी समर्थांचा फोटो आहे. ना मंदिरात, ते बघून मी घर घेतलं. मी त्यांना खूप मानतो. म्हणून मी हे घर खरेदी केलं. मी त्यावेळी इतकी ढसाढसा रडले.”
अमृताने सांगितले, ”माझ्याबरोबर घडलेला हा किस्सा आहे. मी तिथे बसल्या बसल्या स्वामींना सॉरी म्हणाले. की सॉरी, मला वाटलं की तुमचं लक्ष नाही माझ्याकडे. आणि तुम्ही हे घडवूण आणलेत. आय अॅम सॉरी. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण आमच्याकडे पैसे नव्हते. पुढचा घराचा हप्ता थकला असता. नंतर बँक आणि इतर अडचणी आल्या असत्या. त्याचा त्रास झाला असता. ज्यांनी हे घर घेतलं, ते कपल तिथे 3 वर्ष राहिलं. आम्हाला त्या घराचा फार त्रास झाला नाही.”
अमृताने सांगितलेला अनुभव अभ्दुत आणि आश्चर्यकारक होता असं प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.






