मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिलिंद सोमणने मुंबईत चार बेडरुमचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. मिलिंदने मुंबईतील प्रभादेवी परिसरात 4 बेडरूमचा फ्लॅट बुक केला आहे. हे सुमारे 1720 चौरस फूट आहे. मिलिंद सोमणचे नवीन घर केवळ आलिशानच नाही तर लोकेशनच्या दृष्टीनेही खूप खास आहे. दादर बीच इथून फार दूर नाही. तसेच जैन मंदिर आणि प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर फार दूर नाही. याशिवाय दादर स्टेशन फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक राहुल थॉमस यांनी मिंटला सांगितले की, प्रभादेवी परिसरातील अपार्टमेंट समुद्रापासून 100 मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. मिलिंद सोमणचे स्वागत करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, असेही ते म्हणाले.
कामाच्या आघाडीवर, मिलिंद सोमण लवकरच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. यामध्ये कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. मिलिंद सोमण सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लुक समोर आला