अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) त्यांच्या अभिनयाशिवाय आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा मीडियाच्या चर्चेत असतात. अनेकदा ते उघडपणे विविध मुद्द्यांवर त्यांचं मत व्यक्त करताना दिसतात. पण त्यांनी व्यक्त केलेलं मत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांच रुप घेतात. सध्या त्यांचं एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे. मुघलांना विध्वंसक म्हटल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या ‘ताज: डिवाइडेड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आले आहेत. लवकरच ही वेब सीरिजप्रदर्शित होणार आहे, रिलीजपूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात मुघल बद्दल वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ‘लोकांना इतिहासाची योग्य माहिती नसल्यामुळे ते द्वेष आणि चुकीच्या माहितीचं साम्राज्य आहे. कदाचित त्यामुळेच आता देशातील एक वर्ग भूतकाळाला, विशेषतः मुघल साम्राज्याला दोष देत राहतो. ‘जर मुघल साम्राज्य इतके राक्षसी, इतके विध्वंसक होते, तर त्यांना विरोध करणारे मुघलांनी बांधलेली स्मारके का पाडत नाहीत? त्यांनी जे काही केले ते भयंकर असेल तर ताजमहाल पाडा, लाल किल्ला पाडा, कुतुबमिनार पाडा. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो? तो मुघलांनी बांधला होता. आपल्याला त्याचा गौरव करण्याची गरज नाही किंवा त्याची बदनामी करण्याची गरज नाही.
‘ताज-डिव्हाइड बाय ब्लड’ हा एक पीरियड ड्रामा आहे, ज्यामध्ये मुघल साम्राज्याची ओळख करून देण्यात आली आहे. या मालिकेत धर्मेंद्र व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह, आदिती राव हैदरी, शुभम कुमार मेहरा, आशिम गुलाटी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात आदिती राव हैदरी ‘अनारकली’च्या भूमिकेत, आशिम गुलाटी ‘राज कुमार सलीम’च्या भूमिकेत, ताहा शाह ‘राज कुमार मुराद’च्या भूमिकेत, शुभम कुमार मेहरा ‘राज कुमार दनियाल’च्या भूमिकेत, संध्या मृदुल ‘राणी जोधाबाई’च्या भूमिकेत आणि झरिना वहाब ‘राणी सलीमा’च्या भूमिकेत दिसणार आहेत. ती G5 वर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरिजची कथा मुघल साम्राज्या भोवती फिरते. ३ मार्च पासुन ZEE5 वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
विनोद तावडेंनी शिक्षणमंत्री असताना “अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार” असं सांगितलं होतं. यावरुन आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते”, असं सांगत, तावडेंना उत्तर दिलं. याचवरुन आता वादाला सुरुवात झाली आहे.