Nimrat Kaur Birthday Struggle Life And Success Story Of Dasvi Fame Actress
‘द लंच बॉक्स’ चित्रपटात इरफानच्या अभिनयाला टक्कर देणाऱ्या निम्रत कौरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. गेल्या दीड दशकापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेल्या निम्रतची गणना बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये केली जाते. निम्रत कौरने चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच मॉडेलिंग जगातही नाव कमावले आहे. निम्रतने मॉडेलिंग शोच्या माध्यमातून आपलं नाव कमावलं आहे. तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालीये. निम्रत कौरच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष ते यशापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.
Historical Shows On OTT: ऐतिहासिक वेबसीरीज आवडतात का ? तर OTT वर पाहा ‘हे’ शो
अभिनेत्री निम्रत कौर आजच्या घडीला ही इंडस्ट्रीचा टॉप चेहरा बनली आहे. राजस्थानमधील एका छोट्या शहरातून आलेली निम्रत कौर फक्त बॉलिवूडच नाहीतर, ती आता हॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंतही ती पोहोचली आहे. निमरत कौर ही एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी. निमरत फक्त 11 वर्षांची होती, जेव्हा तिचे वडील काश्मीरमध्ये शहीद झाले. यानंतर, निमरतची आई आपल्या दोन्हीही मुलींना राजस्थानमधील पिलानी इथून नोएडाला घेऊन आली. निमरतनं तिचं शालेय शिक्षण इथेच पूर्ण केलं आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी पूर्ण केली.
‘आई तुळजाभवानी’ महा कॉन्टेस्टचा थाटात समारोप, महाविजेत्याला मिळालं देवीच्या महाआरतीचं दर्शन
या काळात, निमरतनं तिच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी आणि तिच्या अभ्यासाचा खर्च भागविण्यासाठी मॉडेलिंगमध्ये हातभार लावला. दिल्लीमध्ये मॉडेलिंग करत असताना निमरत इतकी काही शिकली की, तिनं मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यानंतर, ती मुंबईला आली आणि २००४ मध्ये तिला सोनू निगमच्या म्युझिक व्हिडीओमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. इथूनच निमरतनं अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि रंगभूमीवर लक्ष केंद्रीत केलं. २०१२ मध्ये, निमरतने ‘पेडलर्स’ चित्रपटात एक छोटी पण शक्तिशाली भूमिका साकारली होती. तिच्या ह्या चित्रपटाचा प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला आणि निमरतला खूप पसंती मिळाली.
‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ ऐकलंत का ? प्रेक्षकांना मराठी गाण्यात मिळणार हिंदी रॅपचा नवा धमाका!
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘द लंचबॉक्स’ चित्रपटानं निम्रतच्या फिल्मी करियरला एक वेग दिशा मिळाली. चित्रपटात इरफान खानसोबत पडद्यावर दिसलेल्या निमरतनं तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं. निम्रतच्या ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे, शिवाय त्यासोबत निम्रतच्या अभिनयाचंही कौतुक झालं. निम्रतनं केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीतच नाही तर ‘होमलँड’ या अमेरिकन टेलिव्हिजन शोमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत तिची ओळख निर्माण केली. निमतर कौरनं अभिषेक बच्चनसोबत ‘दसवी’ चित्रपटातही काम केलं होतं. यानंतर अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट आणि निमरतसोबत अभिषेकचं अफेअर या चर्चांना उधाण आलं होतं.