(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पवन कल्याणचा बहुप्रतिक्षित OG चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीजच्या आधीपासूनच सोशल मीडियावर #OGTrailer आणि #OGConcert हे हॅशटॅग्स ट्रेंड होत असून, चाहते प्रचंड उत्साहित आहेत.
या चित्रपटातून पवन कल्याण एका गंभीर आणि जबरदस्त अॅक्शन लूकमध्ये झळकणार आहे. दिग्दर्शक सुजित यांनी पवन कल्याणला एका हटके शैलीत सादर केल्याचं टीझर आणि प्रोमोजवरून स्पष्ट होतं.त्यामुळे ट्रेलरमध्ये तोच दर्जा पाहायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. यासोबतच, हा ट्रेलर फक्त तेलगू भाषेत प्रदर्शित होणार की हिंदी, तमिळ, कन्नड अशा इतर भाषांमध्येही येणार, यावर सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मोहनलालची प्रतिक्रिया; उघड केल्या भविष्यातील योजना
Ok Ok. Music start in replies and quotes… . #OGTrailer will be released today at the #OGConcert event. pic.twitter.com/oFQOMI0n46
— DVV Entertainment (@DVVMovies) September 21, 2025
वन कल्याणच्या ‘OG’ चित्रपटासाठी एक खास इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट लाल बहादुर शास्त्री स्टेडियम, हैदराबादमध्ये होणार आहे. या इव्हेंटसाठी हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूकीत तात्पुरते बदल केले आहेत.
आधी कधीही न पाहिलेला शाहरुख, अभिषेकचा लुक समोर… किंग सिनेमाच्या सेटवरून फोटो लीक
‘They Call Him OG’ या चित्रपटात पवन कल्याण याच्यासोबत अभिनेत्री प्रियंका अरुलमोहन मुख्य भूमिकेत आहे. तसेच, अभिनेता इम्रान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, श्रिया रेड्डी, प्रकाश राज, अर्जुन दास आणि शाम हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.तर चित्रपटाचे संगीत थमन यांनी दिले आहे आणि ‘DVV एंटरटेनमेंट’ बॅनरखाली डी. व्ही. व्ही. दानय्या आणि कल्याण दासरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.