प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. आजकाल ती कॅमेऱ्यांच्या जगापासून दूर आपल्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. अलीकडेच, तिनं मुलगी मालती मेरीचा (malati Marie) न पाहिलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये चिमुकली मालतीचा हात दिसत आहे. तिच्या या चिमुकल्या हातांना पाहून वडील निक जोनासनही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
[read_also content=”विराट लेक वामिकासोबत लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये स्पॅाट; वामिकाला पाहून नेटकरी म्हणाले… https://www.navarashtra.com/movies/virat-kohlis-photo-with-daughter-vamika-at-a-london-restaurant-goes-viral-510822.html”]
प्रियंकानं दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत, ती मुलगी मालती मेरीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. यावेळी छोटी मालती पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या पोशाखात खूपच क्यूट दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत फक्त मालतीचा हात दिसत आहे. हा फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हा फोटो मालती मेरीचा जन्म झाला तेव्हाचा आहे. या फोटोवर प्रियकांन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘वेळ खरोखरच उडतो. आठवड्याची योग्य सुरुवात…’
प्रियांकानं सोमवारी तिच्या फॅन्ससाठी एक आंनदाची बातमी शेयर होती. प्रियंका ऑस्कर-नामांकित माहितीपट टू किल अ टायगरच्या टीममध्ये सामील झाली. 2022 मधील या डोक्युमेंट्रीमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीच्या वडिलांची कथा दाखवण्यात आली आहे. ज्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होतो आणि तो तिला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडच असतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून प्रियंकासह देव पटेल, मिंडी कलिंग हे देखील कार्यकारी निर्माते म्हणून सामील झाले आहेत.
बॅालिवुड ते हॅालिवुड प्रवास करणाऱ्या प्रियंकाची मागच्या सिटाडेच वेबसिरिज रिलीज झाली होती. त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला त्यानंतर तीचा हॅालिवुडपट लव्ह अगेनही रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रियंका चोप्रा जोनास, सॅम ह्यूघन आणि सेलिन डिऑन यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता तिच्या सध्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर प्रियांकाचे चाहते तिच्या आगामी हॉलिवूड प्रोजेक्ट ‘द ब्लफ’ची वाट पाहत आहेत. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे, ज्याची रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही.