अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनास (Nick Jonas ) आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात आली होती. नुकतचं तिला तिची चुलत बहिण मन्नाराच्या बर्थडे पार्टीत स्पॅाट करण्यात आलं होत. अनेक दिवस कुटुंबासोबत भारतात घालवल्यानंतर आता प्रियंका अमेरिकेला परतली आहे. शनिवारी प्रियांका निक आणि लेक मालती मेरीसोबत विमानतळावर दिसली. मुलीला छातीशी धरुन येतानाच क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला यावेळी पती निकनं पॅपाराझींना पाहून खास इशारा केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी प्रियंका आणि निकचं कौतुक करताना दिसत आहे.
[read_also content=”आदिल खान दुर्रानीने राखी सावंतवर पैसे चोरल्याचा केला आरोप, फसवणूक करणारी आणि ढोंगीही म्हण्टलं! https://www.navarashtra.com/movies/adil-khan-durrani-accused-ex-wife-rakhi-sawant-stealing-money-called-cheater-imposter-nrps-519297.html”]
गेले काही दिवस भारतात घालवल्यानंतर प्रियंकान अमेरिकेची वाट धरली आहे. 30 मार्चला रात्री प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी प्रियंका तिच्या दोन वर्षांच्या मालतीला छातीशी धरून येताना दिसली. तर, तिचा पती निक देखील तिची प्रेमाची काळजी घेताना दिसला. यावेळी त्याच्या हातात त्याच्या मुलीचे खेळणं आणि त्याच्या गळ्यात एक पिशवी होती. प्रियंकाला पाहताच पॅापराझी फोटोसाठी त्यांच्या जवळ आले तेव्हा निकने त्यांना दुरुनच शांत राहण्यास सांगितलं. आपल्या लाडक्या लेकीला त्रास न व्हावा यासाठी त्याने त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. पत्नी आणि मुलीसाठी त्याचं प्रेम पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. काही युझर्संनी त्याला ‘बेस्ट पती’ चा टॅगही दिला आहे.
यावेळी प्रियंका क्रीम रंगाचं स्वेटशर्ट, मॅचिंग पॅन्ट आणि शूज घातलेली दिसली. छोटेशे कानातले वगळता तिने इतर कोणतेही दागिने कॅरी केले नव्हते. तर, निक जोनास काळ्या रंगाचा टी-शर्ट, हिरवी पँट आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये दिसला. त्याने एक बॅगही घेतली होती. दोघांनीही गडद रंगाचे सनग्लासेस घातले होते. तर मालती गुलाबी ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती. यावेळी प्रियांकाने पापाराझींसमोर पोजही दिली नाही कारण तिने मालती मेरीला छातीशी धरुन ठेवलं होतं.