Priyanka Chopra Husband Nick Jonas Cancle His Show In Mexico As He Is Suffering From Influenza Nrps
प्रियंका चोप्राचा पती निक जोनास ‘इन्फ्लुएंझा ए’ नं हैरान, शो करावा लागला रद्द; चाहत्यांची मागितली माफी
प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनास 'इन्फ्लुएंझा ए' या आजाराने त्रस्त आहे. आजारपणामुळे गायकाने मेक्सिकोतील आपला कार्यक्रम रद्द केला आहे. शो रद्द केल्यानंतर त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) नेहमी चर्चेत असते. ती तिच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांसोबत शेयर करत असते. तसाच तिचा पती निक जोनासही (Nick Jonas) सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता निक जोनासबाबत एक बातमी समोर आली आहे. सध्या निक ‘इन्फ्लुएंझा ए’चा (influenza) ने ग्रस्त आहे. शुक्रवारी निकने त्याच्या इंस्टाग्राम अंकाऊटवर एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याला आजार झाल्याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की तो ‘इन्फ्लुएंझा ए’ ग्रस्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो शो करु शकणार नसल्याचं तो म्हणाला आहे.
[read_also content=”वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर ‘8 AM मेट्रो’ OTT वर होणार रिलीज, ‘या’ तारखेपासून पाहता येणार! https://www.navarashtra.com/movies/gushan-daivaiya-saiyami-kher-starter-8-am-metro-will-released-on-ott-soon-nrps-529550.html”]
चाहत्यांची माफी मागितली
निक जोनास जगभरात कार्यक्रम करत असतो. काही दिवसापुर्वी त्याचा मुंबईतही कार्यक्रम झाला होता. आता जोनास बंधू म्हणजेच ‘केविन जोनास’, ‘निक जोनास’ आणि ‘जो जोनास’ या आठवड्यात मेक्सिकोमध्ये परफॉर्म करणार होते. पण ऐनवेळी प्रकृती बिघडल्याने त्याला कार्यक्रम रद्द करावा लागला. यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. निकनेही चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याने सांगितले की, जोनास बंधूंच्या शोची तारीख बदलण्यात आली आहे.
काय म्हणाला निक
निक म्हणाला, ‘डॉक्टरांच्या तपासणीनंतरही माझ्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. मला लवकर बरे व्हायचे आहे. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला तुम्हाला निराश करायचे नव्हते. आपण सर्वांनी खूप सहकार्या केले आहे. तुम्ही लोक या शोसाठी दूरदूरवरून आला आहात. मला इतकेच सांगायचे आहे की, मला खूप वाईट वाटते. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांची माफी मागतो.
निक जोनासने त्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आपली तब्बेतीबद्दल सांगितलं. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, ‘दोन दिवसांपूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. काल दिवसभर मी अंथरुणावर पडून होतो. मला ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप खोकला आहे. त्यामुळे तो कार्यक्रमात परफॅार्म करू शकणार नाही.
आता ऑगस्टमध्ये होणार शो
व्हिडिओ शेअर करताना निकने एक लांबलचक नोट लिहिली आहे. त्याने चिठ्ठीत लिहिले आहे की, तो ‘इन्फ्लुएंझा ए’ आजाराने त्रस्त आहे, त्यामुळे तो गाणे गाऊ शकत नाही. त्याने लिहिले की, तो मेक्सिकोमध्ये होणाऱ्या शोमध्ये सहभागी होऊ शकत नाही. निकने माफी मागितली आणि आता हा शो ऑगस्टमध्ये होणार असल्याचे सांगितले.
Web Title: Priyanka chopra husband nick jonas cancle his show in mexico as he is suffering from influenza nrps