सोनी BBC Earth कडून राकेश खत्रींचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव
BBC Earth हा एक अत्यंत लोकप्रिय चॅनेल आहे. या चॅनेलवर निसर्ग, प्राणी, पर्यावरण आणि पृथ्वीवरील विविध अद्भुत घटकांविषयी उत्कृष्ट माहिती देणारे प्रोग्रॅम्स प्रसारित होत असतात. त्यात प्राणी जीवनाचे दृश्य, पृथ्वीच्या अद्भुत निसर्गाचे चित्रण आणि इतर साहसी व माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी दाखविल्या जातात. BBC Earth चा उद्देश प्रेक्षकांना निसर्गाची महती आणि संवर्धनाची आवश्यकता समजावून सांगणे आहे. प्राण्यांच्या जीवनातील व त्याच्या विविधतेतील अनोख्या गोष्टी दाखवणारे आणि वातावरणासंबंधीचे विचार जागरूक करणारे हे चॅनेल वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता याच BBC Earth ने राकेश खत्री यांना ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून घोषित केले आहे.
Meenal Shah Wedding: मीनलचे ‘तथागत’ मनोमिलन, बांधली गोव्यात लग्नगाठ; चाहत्यांना दिला सुखद धक्का
BBC Earth ने राकेश खत्री यांना या महिन्याचे ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून घोषित केले आहे. खत्री यांना प्रेमाने ‘नेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे कार्य पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खत्री यांनी पक्षांची घरटी बांधण्यासाठी इको-फ्रेंडली साहित्याचा नावीन्यपूर्ण वापर केला आहे, ज्यामुळे पक्षांच्या सुरक्षित निवासस्थानांच्या निर्माणात मोठे योगदान दिले आहे. शहरी भागात पक्षांची संख्या कमी होत चालली होती, परंतु खत्री यांच्या उपक्रमामुळे या भागातील अनेक पक्षांना सुरक्षित आश्रय मिळाला आहे. त्यांच्या कलेतून विविध पक्षी घरटी निर्माण करून निसर्गाच्या समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याने पक्षी संवर्धनाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला आहे. खत्री यांचे हे कार्य पाहून लोक पर्यावरणाच्या संवर्धनास अधिक महत्व देण्यास प्रवृत्त होतात. त्यांना ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरवण्यात आले हे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि पर्यावरणाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
शहरीकरणाच्या रेट्यात निवासस्थान गमावणाऱ्या पक्षांना घरे प्रदान करण्याच्या निष्ठेने प्रेरित राकेश खत्री यांना टेट्रा पॅक, ताग आणि अगदी भंगार लाकडाचा उपयोग करून ईको-फ्रेंडली घरटी बनवण्याची कल्पना सुचली. प्रारंभिक आव्हाने आणि अडचणींवर मात करून राजेशनी चिकाटीने काम केले. जेव्हा त्यांच्या पहिल्या घरट्यात एक चिमणी येऊन राहिली तेव्हा त्यांच्या प्रयत्नांचे चीज झाले. तेव्हापासून ते पक्षांची घरटी तर बनवतच आहेत, शिवाय चर्चा, पाठ आणि कार्यशाळांच्या माध्यमातून पक्षी संवर्धनाचा सक्रिय प्रचार देखील करत आहेत. परिणामी, आत्तापर्यंत 7 लाखापेक्षा जास्त घरटी बनवण्यात आली आहेत आणि 10 लाखांच्या वर घरटी बनवण्याचे त्यांचे पुढील लक्ष्य आहे.
खत्री यांना प्रतिष्ठित लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स अवॉर्ड देखील मिळाला आहे. त्यांच्या कामगिरीची जगभरातून विविध पुरस्कार देऊन दखल घेण्यात आली आहे.