गेल्या दोन-तीन दिवसापासुन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या (Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement) चर्चांना पेव फुटलं आहे. हे दोघंही लवकरत साखरपुडाही करुन शकतात असंही सांगितलं जात होतं. त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र, या सगळ्या चर्चांबाबत विजयच्या टिमने खरं काय ते सांगितलं आहे. दोन्ही कलाकारांच्या टीमने सारखपुड्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
[read_also content=”अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे! पार्थ भालेरावनं दिग्दर्शन केलेलं एकपात्री नाटक ‘हम दोनो और सूट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/movies/parth-bhalerao-diretorial-debut-by-play-hum-dono-aur-ek-suit-nrps-496688.html”]
गेल्या कित्येक वर्षापासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अनेकदा या कपलला एकत्र स्पॅाट करण्यात आलं. असं असलं तरीही या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं असून आतापर्यंत रिलेशनबद्दल अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. मात्र, चाहत्यांनाही यांची जोडी आवडतं असून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. काही दिवसापुर्वी, विजय आणि रश्मिकने एकत्र नवं वर्ष सेलिब्रेट केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे आता त्यांच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
विजय आणि रश्मिकाने गीता गोविंदम या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली. या चित्रपटाला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. तेव्हापाहून त्यांची जोडी चर्चेत आली त्यानंतर डिअर कॅाम्रेड या चित्रपटातही दोघ एकत्र आले. हा चित्रपटही हिट ठरला. मात्र,गीता गोविंदम च्या सेटवर या त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. तेव्हापासून या दोघांच नाव जोडलं जात आहे. चाहतेही त्यांना ऑनस्क्रिन एकत्र पाहिल्यानंतर आता ऑफस्क्रिन एकत्र पाहण्यासाठी उत्साही आहेत. आता ही ऑनस्क्रीन हिट ठरलेली जोडी लवकरच साखरपुडा करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.