दिवंगत बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट (Satish Kaushik Last Movie) ‘कागज-2’ (Kaagaz 2) 1 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली प्रदर्शित झाला होता ज्याचे खूप कौतुक झाले होते. ‘कागज’ चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते, तर सतीश कौशिक ‘कागज-2’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मागील भागाप्रमाणेच या भागाची कथाही एका सामान्य माणसाच्या व्यवस्थेविरुद्धच्या लढ्याची आहे.
[read_also content=”अमिताभ बच्चन यांची पुन्हा अयोध्यावारी, रामल्लाचं दर्शन घेत केली पूजा! https://www.navarashtra.com/movies/amitabh-bachhan-visited-ayodhya-ram-mandir-for-second-time-nrps-505709.html”]
अनिल कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून तो पोस्ट करताना तो भावूक दिसत होता. त्याने लिहिले, “हा चित्रपट अतिरिक्त खास आहे… माझ्या प्रिय मित्राचा शेवटचा चित्रपट. मी भाग्यवान आहे की मी त्याला शेवटच्या वेळी परफॉर्म करताना पाहू शकलो. Kaagaz ट्रेलर रिलीज झाला आहे. 1 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
अनिल कपूर, सतीश कौशिक आणि अनुपम खैर हे जवळचे मित्र होते, परंतु 9 मार्च 2023 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता प्रेक्षकांना त्यांची ही खास व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर शेवटच्या वेळी पाहायला मिळणार आहे. अनिल कपूरच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता करणवीर शर्माने लिहिले- सतीश जींसाठी हा चित्रपट नक्कीच पाहीन. खूप चांगला ट्रेलर आहे.