मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात (Cruise Drugs Case) वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आणि कारागृहाची हवा खावी लागलेला चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (aryan khan) त्याचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने (mumbai session court) नार्कोटिक विभागाला (NCB) दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्यन खानला दिलासा मिळाला आहे.
[read_also content=”मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मोडकसागर तलाव ओव्हर फ्लो https://www.navarashtra.com/maharashtra/modaksagar-lake-overflow-after-heavy-rain-nrsr-303913.html”]
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया आलिशान क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा अशा २० जणांना अटक करण्यात आली. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्याला मुंबई उच्च न्यायालयाने २८ ऑक्टोबर रोजी अटीशर्तींसह जामीन मंजूर करताना आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा, अशी अटही सामील होती. त्यानुसार आर्यनने आपला पासपोर्ट नार्कोटिक विभागाकडे जमा केला होता. नार्कोटिक विभागाने याप्रकरणी आरोपपत्र दाखल कऱण्यात आले असून आर्यनला क्लीन चिट दिली होती. एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आपल्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे आपल्याला पासपोर्ट परत करावा, असा अर्ज आर्यनकडून सत्र न्यायालयात करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने एनसीबीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार बुधवारी विशेष एनडीपीएस न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. एनसीबीच्यावतीने दोन पानी उत्तर न्यायालयात सादर करण्यात आले आणि आर्यनला पासपोर्ट परत करण्यास त्यांची कोणतीही हरकत नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले. तर आर्यनला या प्रकरणातून औपचारिकपणे मुक्त करण्यात आले आहे. एनसीबीने दाखल केलेल्या उत्तरात आर्यनविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसून त्याच्यासंदर्भात कोणताही तपास प्रलंबित नाही असे स्पष्ट केले असल्याचे आर्यानच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याला पासपोर्ट परत करावा, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने एनसीबीला आर्यनला पासपोर्ट परत करण्याचे निर्दश दिले.