(फोटो सौजन्य - x अकाउंट)
ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपट गेल्या महिन्यात ईदच्या आदल्या दिवशी बॉक्स ऑफिसलवर रिलीज झाला. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘सिकंदर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यानंतर तो जबरदस्त फ्लॉप ठरला आहे. २५० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाला १५ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार करणंही कठीण होऊन बसलं आहे. जाणून घेऊया चित्रपटाने १५ दिवसांत देशासह परदेशामध्ये किती कोटींची कमाई केली आहे…
Salman Khan Threat: तारीख तिच, पुन्हा धमकी; सलमान खानचा जीव धोक्यात?
घोषणा झाल्यापासून कमालीचा चर्चेत राहिलेला हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल अशी अपेक्षा होती, तसं काहीच घडलं नाही. काही दिवसांतच १०० ते २०० कोटींचा टप्पा गाठेल, अशी अपेक्षा असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पहिल्या आठवड्यात ठिक ठाक कमाई केल्यानंतर, ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईमध्ये दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर घट पाहायला मिळाली. ‘सिकंदर’ चित्रपटाने १५ दिवसांत १०० कोटींचाच टप्पा गाठला आहे. चित्रपटाने आता ११० कोटींची कमाई केलेली आहे.
Salman Khan: ‘कारही बॉम्बने उडवून देणार…’, सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ९०. २५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १७.५५ कोटींचीच कमाई चित्रपटाने आता केली आहे. २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘सिकंदर’ चित्रपटाला निर्मितीचा खर्च गाठे पर्यंत फार काळ वाट पाहावी लागेल. कासव गतीने चाललेली कमाई पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती काळ टिकेल ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटानंतर रिलीज झालेला ‘जाट’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. ‘जाट’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर १० एप्रिलला रिलीज झाला होता. या चित्रपटाने चार दिवसांत २५ ते ३० कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे.
‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदानासोबत काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर ‘बाहुबली’ चित्रपटातील कटप्पा म्हणजेच अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत आहे.