फोटो सौजन्य - सोशल मीडिया
स्मृती इराणी : “सास भी कभी बहू थी” या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री स्मृती इराणी सध्या राजकरणामध्ये व्यस्त आहे. टेलिव्हिजनवरची तिची मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ती तिच्या मालिकेच्या मार्फत घराघरात पोहोचली होती. त्यांनतर तिने राजकारणामध्ये पाऊल ठेवले आणि तिला जनतेचं प्रेम मिळालं. आता स्मृती इराणी १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनुपमामध्ये स्मृती इराणी खास कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. स्मृती इराणी रुपाली गांगुलीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.
स्मृती इराणी अनुपम शोमध्ये दिसणार अशी माहिती समोर आली आहे. मात्र, या शोमध्ये स्मृती यांच्या प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. अनुपमा शोबद्दल सांगायचे तर, अलीकडेच शोमध्ये १५ वर्षांची लीप झाली आहे. या शोमध्ये अनेक नवीन पात्रांची ओळख झाली असून अनेक जुन्या स्टार्सनी शो सोडला आहे. रुपाली गांगुली, अरविंद वैद्य आणि अल्पना बुच अजूनही या शोचा एक भाग आहेत. हा शो मनोरंजक व्हावा यासाठी निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तुम्हाला सांगतो की लीपमुळे अनेक कलाकारांनी शो सोडला. या यादीत सुधांशू पांडे, मदालसा शर्मा, निधी शाह, निशी सक्सेना, गौरव शर्मा, कुंवर अमर सिंह आणि भटनागर यांनी शो सोडला आहे.
स्मृती इराणी यांनी एक सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने जया भट्टाचार्यसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली लिहिले आहे की, दसऱ्यावर चांगले, वाईट.. आणि महाकाव्य नाटक. असे कॅप्शन देखील दिले आहे.
आता अलिशा परवीन या शोमध्ये आध्याच्या भूमिकेत आहे. शोमध्ये अलीशाची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. या शोमध्ये तिच्यासोबत शिवम खजुरिया दिसणार आहे.