Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Song Will Play During IPL Match His Looks Grabs Attention Watch Video
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण सध्या कमालीचा चर्चेत आहे. त्याचा येत्या २५ एप्रिलला ‘झापुक झुपूक’ नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे करीत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेत्या पदाची ट्रॉफी जिंकत महाराष्ट्राच्या घराघरांत प्रसिद्ध झालेला सूरज चव्हाण आता IPL च्या मॅचमध्ये प्रमोशनसाठी जाणार आहे.
“मला तुझं कामही…”, सोनाली कुलकर्णीचा मराठी चित्रपट पाहून विद्या बालनने केलेलं कौतुक
आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ‘मुंबई इंडियन्स’ ( MI ) विरुद्ध ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ (RCB) असा क्रिकेटचा सामना रंगणार आहे. या सामन्यादरम्यान सूरज चव्हाण त्याच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती लावणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातलं ‘झापुक झुपूक’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आता हे गाणं सूरजच्या चित्रपटातलं ‘झापुक झुपूक’ हे गाणं दरम्यानच्या सामन्यामध्ये स्टेडियममध्ये वाजवण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित क्रिकेटप्रेमी या गाण्यावर ठेका धरतील. सध्या सूरजच्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
व्हिडिओ शेअर करताना सूरजने कॅप्शन दिलंय की, “आज MI विरुद्ध RCB च्या सामन्यामध्ये आपलं ‘झापुक झुपूक’ गाणं वाजणार आणि ह्यो तुमचा टॉपचा किंग सगळीकडे गाजणार! 25 एप्रिल – झापुक झुपूक तुमच्या जवळच्या थेटरात…!”, ‘गुलीगत सूरज चव्हाण’एकदम हटके लूक करत ही मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेला आहे. ‘मुंबई इंडियन्स’ची जर्सी आणि स्टायलिश जीन्स असा लूक करून सूरज वानखेडे स्टेडियमवर पोहोचला आहे. त्याच्या जीन्सवर असलेल्या काही पॅचेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, सूरजच्या जीन्सवर “बुक्कीत टेंगूळ”, “दिलात ‘झापुक झुपूक” अशा त्याच्या गाजलेल्या डायलॉगचे पॅचेस लावण्यात आलेले आहेत.
दरम्यान, सूरजने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. त्याने शेअर केलेला लाखो चाहत्यांनी पाहिलेला आहे. शिवाय, ८६ हजारांहून अधिक चाहत्यांनी व्हिडिओला लाईक्स केले असून कमेंट्सचा वर्षावही करण्यात आलेला आहे. सूरज चव्हाणसोबत ‘झापुक झुपूक’ चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.