Tejaswini Pandit Started New Business Midnight Salon In Pune Nrps
तेजस्विनीनं पुण्यात सुरू केला नवा व्यवसाय, राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलं उद्घाटन!
तेजस्विनी पंडितनं पुण्यात एक सलून सुरू केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या सलूनचं उद्घाटन पार पडलं. याचे फोटो तेजस्विनीनं सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
काही दिवसांपासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित चर्चेत आहे. अभिनयासोबत ती सामाजिक विषयांवरही परखडपणे आपलं मत मांडत असते. राजकीय घडामोडींबाबतही ती पोस्ट शेयर करते. आता यावेळी पुन्हा तिचं नाव चर्चेत आलंय ते म्हणजे तिच्या नव्या व्यवसायामुळे. तेजस्विनीने अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने पुण्यात मिडनाईट सलून सुरु (tejaswini pandit salon in pune)केलं आहे. या सलूनचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. यावेळी सिद्धार्थ जाधवं देखील तिला शुभेच्छा देण्यासाठई (Siddharth Jadhav) उपस्थित होता.
गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलय. यामध्ये आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं सुद्धा नाव जोडल्या गेलंय. तेजस्विनीने पुण्यात पहिलं वाहिलं मिडनाईट सलून सुरू केलं आहे. “AM to AM या नावाने हे सलून सुरू केलं आहे. याचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
तेजस्विनी पंडितनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्विनीच्या सलूनची झलक बघायला मिळत आहे. या व्हिडीओला तेजस्विनीनं कॅप्शन दिलं, “आदरणीय श्री.राज ठाकरे साहेबांचे त्यांच्या उपस्थितीबद्दल आणि आजची संध्याकाळ समृद्ध केल्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद!!”
तेजस्विनीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर ,ओंकार भोजने या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. आता तेजस्विनीचा ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तेजस्विनी जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा या सिनेमातील लूक आऊट करण्यात आला.
Web Title: Tejaswini pandit started new business midnight salon in pune nrps